डॉ.दीपक धोत्रे .M.B.B.S.D.C.H.(Mumbai)
15,268 Views

 डॉ .दीपक धोत्रे                                                    मो – 7745040777                                        पंढरपूर                                                      आरोग्यम धनसंपदा 

भाग – १
लहान मुलांमधील आहारसंबधी समस्या….
माझ्या दैनंदिन वैद्यकीय सेवेमध्ये मला नेहमी हमखास येणारा बाळाच्या व मुलामुलींच्या पालकांचा प्रश्न म्हणजे –
“आमच बाळ जेवतच नाही डॉक्टर यावर काही तरी उपाय सांगा “ तर आजच्या सदरात मी या विषयावर सर्व पालकांच प्रबोधन करावे असे मला वाटते.
तर यासाठी सर्व प्रथम बालकांच्या वाढीच्या अवस्था यावर प्रकाश टाकूयात व या प्रत्येक अवस्थेत मध्ये बाळाच्या वाढीवर परिणाम करणारे घटक यावर चर्चा करू
1 ) बाळाच्या आईच्या उदरात असणार 9 महिन्याचा काळ
2 ) बालकाचा जन्म ते एक महिने कालावधी – नवजात शिशु काळ
3 )  1 ते 6 महिने – बालक अवस्था
4 ) 6 महिने ते 2 वर्षे – शिशु अवस्था
5 ) 2 वर्षे ते 4 वर्षे – शिशु अवस्था
6 )4 वर्षे ते 10 वर्षे
7 ) 10 वर्षे ते 14 वर्षे – किशोरवयीन अवस्था
8 ) 14 वर्षे ते 16 वर्षे – पौगंड अवस्था

डॉ.दीपक धोत्रे .M.B.B.S.D.C.H.(Mumbai)
डॉ.दीपक धोत्रे .M.B.B.S.D.C.H.(Mumbai)

१) बाळाचा आईच्या उदरात असणार 9 महिन्यांचा काळ – बाळाची वाढही आईच्या पोटात असताना पहिल्या दिवसापासून ते 9 महिन्यापर्यंत होतच असते व यामध्ये खालील घटक बाळाच्या वाढीवर परिणाम करणारे असतात.

1)आईचे वय – कमी वयात गर्भधारणा ही कमी वजनाच्या बाळाला जन्म देणारा घटक आहे.

2)आईचे वजन – कमी वजनाची, अशक्त माता ही कमी वजनाच्या बाळाची प्रसूती होण्याचे कारण आहे. संपूर्ण 9 महिन्यात आईच्या मूळ वजनाच्या अंदाजे 10 किलो वजन वाढ होने गरजेचे असते.

3)आईला गरोदरपणात ब्लडप्रेशर जास्त असणे, कमी हिमोग्लोबिन असणे ,शरीरामध्ये वेगवेगळे इन्फेक्शन असणे , या गोष्टी बाळाच्या वाढीवर परिणाम करणाऱ्या असतात.

4)आईला पुरेशी झोप, योग्य आहार, कमी मानसिक त्रास यांचा परिणाम बालकाच्या वाढीवर होत असतो.

2) बाळाच्या जन्म ते 1 महिण्याचा कालावधी
ज्या बाळाने संपूर्ण 9 महिने घेतले अशा बाळाचे जन्माचे वजन हे कमीत कमी 2.5 किलो पेक्षा जास्त असणे अपेक्षित असते.
पहिल्या पंधरा दिवसांत बाळाच्या त्वचेखाली भागात असणारे पाण्याचे प्रमाण कमी होण्यामुळे बाळाचे वजन 100 ते 150 ग्रॅम ने घटणे हे सामान्य समजले जाते .
तसेच बाळाची प्रसूतीकाळात झालेल्या विविध घटकांचा परिणाम बाळावर होत असतो जसे की – १)बाळाच्या सभोवतील असणारे पाणी यात जंतू संसर्ग होणे.
२)बाळाला गुंडाळला वापरले जाणारे अस्वच्छ कापड , ३)बाळाची स्वच्छता यामुळे होणारा जंतुसंसर्ग
४)बाळाला बाहेरील पाणी किंवा मध चाटवणे यामुळे पोटात होणारा जंतुसंसर्ग
बाळाला आई पासून उपलब्ध होणाऱ्या दूधाचे प्रमाण यावर सुद्धा बालकांच्या वजनाची वाढ अवलंबून असते
बराच काळ काही अपरिहार्य करण्यामुळे बाळ आय सी सु मध्ये असने या सर्व घटकांचा परिणाम बाळाच्या पहिल्या महिन्यामध्ये होणाऱ्या वाढीवर होत असतो.
3 ) 1 महिना ते 6 महिने – या काळात बाळाच्या संपूर्ण शरीराच्या वाढती गरज ही त्यांच्या आईच्या दुधाने पूर्ण होत असते .
अंदाजे दर दीड ते दोन तासाने स्तनपान करणे गरजेचे असते. त्यासाठी बाळाची योग्य पोझिशन देऊन कमीत कमी 15 ते 20 मिनिटे स्तनपान होणे गरजेचे असते .जर मातेच्या दुधातील सुरवातीचे दूध पिऊन बाळ झोपून जात असेल तर सुरवातीच्या दुधात पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे बाळाचे अपेक्षित वजन न वाढणे असा समस्या दिसून येतात.
बाळाच्या सतत रडण्यामागे अनेक कारणे असू शकतात परंतु फक्त दूध कमी पडत असेल अशा घरांतील जेष्ठ व्यक्तीच्या सल्लाने बाळास बाहेरील पॅकबंद दूध पिशवी मधील दूध ,म्हशीचे दूध असे देण्याचा प्रयत्न केला जातो व असे दूध पचविण्यास बाळाचे आतडे अजून पूर्णतः तयार झालेले नसल्यामुळे वारंवार उलट्या, जुलाब होणे अशा कारणामुळे बाळाचे अपेक्षित वजन वाढ होत नाही

( लहान मुलांमधील वाढीच्या समस्या व त्याची कारणे व निराकरण जाणून घ्या पुढील शुक्रवारी                   दि.11-1 -19  भाग दोन मध्ये आरोग्यम धनसंपदा विथ डॉ. दिपक धोत्रे.)

( सदर लेखातील मते ही पूर्णपणे लेखकाची आहेत. )

जाहिरात Extra

Video Advertisement

1 thought on “लहान मुलांमधील वाढीच्या समस्या व त्याची कारणे व त्याचे निराकरण..

Leave a Reply

Your email address will not be published.

FM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन डबल क्लिक करा

ताज्या बातम्या