संडे स्पेशल – भ्रष्टाचाराची काळी घुस !

296 Views

संपादकीय

 संपूर्ण देशाला भ्रष्टाचाराच्या काळ्या घुशीने पोखरून काढले आहे.सत्ता कोणाकडे ही असो ही घुस मात्र दिवसेंदिवस बलाढ्य होत चालली आहे . काँग्रेसने केलेल्या ऑगस्टा वेस्टलॅण्ड प्रकरणात दलाली मिळाली आहे व त्या संबंधितील आरोपी कितीही मोठे असले, तरी त्यांना या प्रकरणाचा जाब द्यावा लागेल. पण ऑगस्टा वेस्टलॅण्ड प्रकरणात ब्रिटिश दलाल ख्रिस्तीयन मिशेलने श्रीमती गांधी व त्यांच्या काँग्रेसचे नाव घेतले म्हणून राफेल विमान घोटाळा लोक विसरतील असे कुणी अजिबात समजू नये. सोनिया गांधी व त्यांचे सुपुत्र राहुल गांधी यांना 2019 आधी घेरण्याचा हा उत्तम प्रकार आहे. महागाई, बेरोजगारी, नोटाबंदी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, राममंदिर हे विषय प्रचारातून मागे पाडायचे व मिशेल महाराजांचेच नामस्मरण लोकांना पुनः पुन्हा करून द्यायचे असे आता भाजपवाले करत आहेत .पण यातून काही साध्य होणार नाही.

सोनिया गांधी कॉग्रेस
   सोनिया गांधी कॉग्रेस

सोनिया गांधी किंवा त्यांच्या काँग्रेसविषयी आम्हाला तिळमात्र ही घेणेदेणे नाही असण्याचे कारण नाही, पण राजकीय षड्यंत्रासाठी सरकारी यंत्रणांचा बेबंद वापर करू नये हे आमचे मत ठाम आहे. 3600 कोटींच्या ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर व्यवहारातील ब्रिटिश दलाल ख्रिस्तियन मिशेलने चौकशीदरम्यान सोनिया गांधी यांचे नाव घेतल्याची माहिती अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजे ‘ईडी’ने दिल्लीच्या कोर्टात दिली व त्यावरून काँग्रेस आणि भाजपात बाचाबाची सुरू झाली आहे. हा जो कोणी मिशेल आहे त्यास दुबईतून ताब्यात घेतले व दिल्लीस आणले.त्या दरम्यान देशातील पाच राज्यांतील निवडणुकांचा वणवा चांगला पेटला होता व त्यामुळे भाजपच्या बुडास आग लागली होती. पंतप्रधान मोदी यांनी एक-दोन मोठ्या प्रचारसभेत मिशेलचा उल्लेख करून सांगितले होते की, ‘आता बघा काय स्फोट होतात ते. ब्रिटनचा दलाल मिशेल आणला आहे. आता मी कुणालाच सोडणार नाही.’ या सगळ्यांचा अर्थ आता लागत आहे. मिशेल हा सोनिया गांधींचे व त्यांच्या मुलाचे नाव घेणारच हे पक्के होते व तसे संकेतही पंतप्रधानांना होते. मिशेलची चौकशी सुरू होण्याआधीच मोदी यांनी गांधीं परिवाराकडे बोट दाखवून तपासाची दिशा स्पष्ट केली हे जरा नवलच वाटण्यासारखे आहे .

भाजप पराभूत :

एवढे होऊन ही भाजपची पाच राज्यात तुन हकालपट्टी करण्यात आली,पण भाजपवाल्यांचे मिशन मिशेलचे लक्ष्य 2019 आहे व तसे स्पष्टपणे दिसत आहे. मिशेल हा सध्या कोठडीत आहे व आतमध्ये काय सुरू आहे ते कुणालाच सांगता येत नाही. सोहराबुद्दीन एन्काऊंटर प्रकरणाचा निकाल याचदरम्यान लागला व अमित शहा यांच्यासह सर्वच आरोपी निर्दोष सुटले. न्यायालयात म्हणे सीबीआय व इतर तपास अधिकाऱ्यांचे असे निवेदन आहे की, या प्रकरणात भाजपच्या बड्या नेत्यांची नावे घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव होता व त्याप्रकरणी ही नावे घेतली गेली. सत्ताबदल झाला नसता तर ही नावे त्या खून प्रकरणात तशीच राहिली असती. आता काँग्रेसवाले नेमके तेच सांगत आहेत. सोनियांचे नाव घेण्यासाठी मिशेलवर दबाव टाकला जात आहे.

पप्रतप्रधान नरेंद्र मोदी
    प्रतप्रधान नरेंद्र मोदी भाजप

याचा सरळसोट अर्थ असा की, सरकारी यंत्रणा दोनचार लोकांच्या टाचेखाली आहे व राजकीय विरोधकांना विविध प्रकरणांत गुंतवण्यासाठी यंत्रणेचा सोईस्करपणे गैरवापर सुरू आहे. ऑगस्टा वेस्टलॅण्ड प्रकरणात 432 कोटी रुपयांची लाच वाटण्यात आली व देशाच्या माजी हवाई दलप्रमुखांना या प्रकरणात अटक झाली यापेक्षा धक्कादायक दुसरे काय असू शकेल!

मिशेल आणि ओलांद :
मिशेलने जसे सोनिया गांधींचे नाव घेतल्याचा दावा आहे तसे राफेलप्रकरणी पंतप्रधान मोदी व अनिल अंबानींचे नाव थेट फ्रान्सचे माजी राष्ट्रपती ओलांद यांनी घेतले व हा घोटाळा किमान कित्येक हजार कोटींचा आहे. ऑगस्टा वेस्टलॅण्ड प्रकरणात 432 कोटी रुपयांची दलाली वाटली. राफेल प्रकरणात विमानांच्या किमती वाढवून घेतल्या व त्यात एका उद्योगपतीचे कल्याण झाले. म्हणजे राफेल विरुद्ध ऑगस्टा वेस्टलॅण्ड अशी ही लढाई आहे. सोनिया गांधी व त्यांचे सुपुत्र राहुल गांधी यांना 2019 आधी घेरण्याचा हा प्रकार आहे व क्वात्रोचीनंतर आता देशात मिशेलपुराण सुरू होईल. मिशेल आत आहे व बाहेर भक्तांनी त्याचा जयजयकार सुरू केला आहे. महागाई, बेरोजगारी, नोटाबंदी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, राममंदिर हे विषय प्रचारातून बाहेर पडले आहेत आणि मिशेल व ओलांद महाराजांचेच नामस्मरण सध्या देशात सुरू आहे असे दिसते. त्या सगळ्यांच्या या ‘बा-चा-बा-ची’तून देशाला आणि जनतेला काय मिळेल याचा कोणी विचारही करत नाही उलट काहीतरी जुगाड करून या काळ्या घुशीला व्यवस्थित पाळण्याचा प्रयत्न सत्ताधारी व विरोधक करत आहेत.
गरज:
खरंच आता असं वाटतं आहे की, कुठे हरवला आहे आपला इंडिया.हे आता लोकांनी समजून घ्यायचे आहे की अशा काळ्या घुशी पाळणाऱ्यांचं करायचं काय ते?

जाहिरात Extra

Video Advertisement

1 thought on “संडे स्पेशल – भ्रष्टाचाराची काळी घुस !

  1. Royalcasino Bonus Kuralları Spor ve CASINO alanında bulunan kampanyalardan herhangi birisini seçerek siteye yatırımda bulunabilirsiniz. Siteye yatırımda bulunan herkes kısa süre içerisinde istediği kazancı elde edebilir. Örnek olarak site içerisine Spor alanına özel 0 Yatırım kampanyası bulunabilir. Bu kampanyadan yararlanan bir kişi belirlenen genel şartlara uyarak yatırdığı tutarda ekstra Bonus kazancı elde edebilir. Çevrim şartı gibi kurallara mutlaka uymak gerekir. Bu kazançlar sizin sitede daha fazla vakit geçirmenize ve daha fazla bahis oynamanızı sağlar. Site içerisinde istediğiniz kadar vakit geçirerek kazanılan Bonuslarla bahis oynayabilirsiniz. Tüm bunları yapmadan önce Bonus genel şartlara ve kurallara uymanız ve bunu takip etmeniz gerekmektedir. Bu şekilde daha sağlam adımlarla hareket edebilirsiniz.

Leave a Reply

Your email address will not be published.

FM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन डबल क्लिक करा

ताज्या बातम्या