माढा लोकसभा युवासेना विस्तारकपदी नगरसेवक उत्तम आयवळे यांची निवड

माढा लोकसभा युवासेना विस्तारकपदी नगरसेवक उत्तम आयवळे यांची निवड
404 Views

पंढरपूर :  प्रतिनिधी

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवा सेना प्रमूख आदित्य ठाकरे यांनी युवा सेना पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. त्यानुसार माढा लोकसभा मतदार संघाच्या युवासेना विस्तारकपदी नगरसेवक उत्तम आयवळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

युवा सेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून पाठवण्यात

माढा लोकसभा युवासेना विस्तारकपदी नगरसेवक उत्तम आयवळे यांची निवड
माढा लोकसभा युवासेना विस्तारकपदी नगरसेवक उत्तम आयवळे यांची निवड

आलेल्या पत्रकाव्दारे निवड झाल्याची माहिती उत्तम आयवळे यांना देण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. त्याचबरोबर यावेळी युवासेनेच्यावतीने जिल्हानिहाय व मतदार संघनिहाय युवासेना विस्तारक व युवासेना सहसचिव पदांच्याही निवडी करण्यात आल्या आहेत. यामध्ये अहमदनगर, शिर्डी, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा, हातकणंगले आदी ठिकाणच्या निवडी करण्यात आलेल्या आहेत.

युवा सेना प्रमूख आदित्य ठाकरे यांनी सोपवलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणार असून माढा लोकसभा मतदार संघात शिवसेना पक्षाचे कार्य व ध्येय धोरणे मतदारांपर्यंत पोहचवण्याचे काम करणार असल्याचे निवडीनंतर उत्तम आयवळे यांनी सांगीतले

जाहिरात Extra

Video Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

FM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन डबल क्लिक करा

ताज्या बातम्या