सरकारच्या अंकुशामुळे पत्रकारांची गळचेपी – आ. पृथ्वीराज चव्हाण

सरकारच्या अंकुशामुळे पत्रकारांची गळचेपी – आ. पृथ्वीराज चव्हाण
328 Views

कराड । प्रतिनिधी

पत्रकारितेवर ज्या ज्या वेळी अंकुश आला, तेव्हा सत्ताधाऱ्यांना परिणाम भोगावे लागले आहेत. मिडीया मुक्त पाहिजे, कोणतीही मर्यादा नको. परंतु संपादकांच्यावर खासगी ग्रुपची दादागिरी झाली आहे आणि त्यांच्यावर सरकारचा अंकुश आहे, त्यामुळे पत्रकारिता स्वतंत्र राहिली नाही, पत्रकारांची गळचेपी होत असल्याचे माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

कराड येथील शासकिय विश्रामगृहात पत्रकार दिनानिमित्त आयोजित पत्रकारांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार आनंदराव पाटील, मलकापूरचे मनोहर शिंदे, शिवराज मोरे, जाकिर पठाण, इंद्रजित चव्हाण यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.

आमदार चव्हाण म्हणाले, आज लोखोच्या संख्येने पत्रकार आहेत. मात्र सरकारचा कंट्रोल असल्याने गंभीर धोका आहे. त्यासाठी आता कायदे करणे गरजेचे आहे. अन्यथा मिडिया वृत्तपत्र स्वातंत्र्य राहणार नाही. लोकशाही इतकाच वृत्तपत्र स्वातंत्र्यांचा प्रश्न गंभीर आहे. आज प्रत्यक्षात किती वृत्तपत्रांना स्वातंत्र्य आहे हा प्रश्न आहे.

सरकारच्या अंकुशामुळे पत्रकारांची गळचेपी – आ. पृथ्वीराज चव्हाण
सरकारच्या अंकुशामुळे पत्रकारांची गळचेपी – आ. पृथ्वीराज चव्हाण

पंतप्रधान मोदी यांनी साडेचार वर्षात एकही खुली पत्रकार परिषद घेतली नाही. वृत्तपत्र स्वातंत्र्याचा, जनतेच्या माहितीचा अधिकाराचा हा अनादर आहे. त्यामुळे पत्रकारांना मोदी सामोरे जावूच शकत नाहीत. त्यामुळे खाजगी मालकांच्यावर सरकारचा अंकुश आहे. तेव्हा आता “क्रास मिडिया ओनरशिप डायरेक्शन” हा कायदा करणे गरजेचे आहे. जेणेकरून एकच ग्रुपला किंवा मालकाला टीव्ही व वृत्तपत्र यांची मालकी मिळणार नाही. अनेकांच्यात मालकी विभागली जाईल.

महत्त्वाचे

सभा आचारसंहिता

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता या मार्च महिन्यात ३ ते ५ तारखेला लागेल. त्यापेक्षा जास्त उशीर होणार नाही. मात्र विधानसभा निवडणुकाबाबत साशंकता आहे. महाराष्ट्रात प्रचंड दुष्काळ आहे, विशेषतः मराठवाड्यात जनावरांना चारा नाही, माणसांना पाणी नाही. त्यामुळे एकत्र घेणे सरकारला परवडणार नाही.

मार्च महिन्यात लोकसभा आचारसंहिता होणार असल्याचे सांगितले

जाहिरात Extra

Video Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

FM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन डबल क्लिक करा

ताज्या बातम्या