लहान मुलांमधील वाढीच्या समस्या व त्याची कारणे व त्याचे निराकरण भाग क्रमशः दोन..

डॉ.दीपक धोत्रे .M.B.B.S.D.C.H.(Mumbai)
784 Views

डॉ.दीपक धोत्रे                                                        मो. 7745 04 0777                                            पंढरपूर                                                               आरोग्यमय धनसंपदा 

भाग क्रमशः 2 

4) 6 महीने ते 2 वर्षे – या वाढीच्या अवस्थेत मध्ये खालील कारणामुळे बाळाच्या वाढीला समस्या उदभवू शकतात.
वयाच्या 6 महिन्यानंतर बाळाचे आतडे बाहेरील पातळ अन्न व पाणी पचविण्यास सक्षम होतात अशा वेळी आईच्या दुधा सोबत वेगवेगळे पातळ पदार्थ बाळास ठराविक अंतराने देणे गरजेचे असते
1) बाळास फक्त आईचे दूध देणे व बाहेरील पौष्टिक पदार्थांचा अन्नाची गरज असते व ही गरज फक्त आणि फक्त आईच्या दुधाने पूर्ण होणारी नसते.
2) नुसतेच बाहेरील दूध व बिस्कीटस हे सुध्दा शरीरास घातक असते.कारण बिस्कीटामध्ये मैदा व साखरेचे प्रमाण अधिक असल्याने यात बाळाच्या शरीरासाठी उपयोग नसतो उलट त्यामुळे बाळाची शी कडक होण्याचा धोका असतो.
3 ) बाळ वारंवार आजारी पडणे या गोष्टीचा सुद्धा बाळाच्या वाढीवर परिणाम होत असतो.
4) कोणत्याही माणसाच्या आयुष्यात त्याचा मेंदूची संपूर्ण वाढ ही पहिल्या 2 ते 3 वर्षापर्यंत होत असल्यामुळे या कालावधीत बाळाचा आहार हा सकस व गुणवत्तापूर्ण, संतुलित असणे गरजेचे असते. या साठी बालरोगतज्ज्ञ, आहारतज्ज्ञ याचा सल्ला मोलाचा ठरु शकतो.
5)चहा, कॉफी, अतिरिक्त गोड पदार्थ यांचा आहारात समावेश केल्यास यांचा परिणाम बाळाची भूक मंदावण्यासाठी कारणीभूत असतात.

5) 2 वर्षे ते 4 वर्षे – या शिशु अवस्थेत मध्ये बाळाच्या वाढीवर परिणाम करणारे घटक खालीलप्रमाणे
1) या अवस्थेत बालकाच्या मेंदूची वाढ व शारीरिक उंची वाढवण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे शरीराची अतिरिक्त गरज भागविण्यासाठी संतुलित आहार महत्वचा असतो

2)या अवस्थेत शिशुच्या आहारात चॉकलेट, वेगवेगळ्या प्रकारचे जंकफूड्स.मैदयाचे पदार्थ बिस्कीटस,ब्रेड,टोस्ट,खारी, या पदार्थाचा समावेश नसावा
3) चहा,शीतपेय, आईस्क्रीम, वेगवेगळ्या पॅकबंद चिप्सचे पदार्थ हे पदार्थ या वयात मुलांच्या खाण्यात असणे हे अनेक पेशंट्समध्ये दिसून आलेले आहे.
4) जर योग्य आहार होऊन सुध्दा बाळाची वाढ न होणे किंवा बाळ वारंवार आजारी पडणे असे दिसून आल्यास बालरोगतज्ज्ञचा सल्ला विविध आजाराचे निदान करण्यासाठी गरजेचा असतो.

डॉ.दीपक धोत्रे .M.B.B.S.D.C.H.(Mumbai)
डॉ.दीपक धोत्रे .M.B.B.S.D.C.H.(Mumbai)

6 ) 4 वर्षे ते 10 वर्षे – या वयोगटातील बालक शाळेमध्ये समाविष्ट असल्यामुळे आजकाल माझ्या पाहण्यात असे जाणवले आहे की बाळाचा शाळा व शिक्षक हे मुलामुलींच्या आहार बाबत जागरूक असतात व शाळेत बालकास देण्यात येणाऱ्या डब्यात कोणते कोणते पदार्थ असावेत याचा ढोबळ तक्ता शाळांकडून दिला जातो ही गौरवाची बाब आहे.
1)या अवस्थेत मुलामुलींची वाढ ही त्यांचा शारीरिक हालचाली किती आहेत व आहार किती संतुलित आहे यावर अवलंबून आहे.
2)जर आपला पाल्य वारंवार आजारी पडत असल्यास ,बाळाचा किंवा विविध इन्फेक्शन पाल्यास होत असल्यास डॉक्टराच्या औषधाच्या बरोबरीने मुलाची प्रतिकर क्षमता ही फार महत्वाची आहे व यासाठी बाळास दिला जाणारा योग्य व संतुलित आहार फार महत्वाचा आहे.
3)जर बालकास कोणताही मोठा आजार असल्यास त्याचे योग्य निदान व उपचार होणे गरजेचे आहे कारण यामुळे सुध्दा बाळाची वाढ मंदावलेली असते
4) मुलामुलींना पोटत जंतूंचा प्रादुर्भाव असणे ही सुद्धा पाल्याच्या वाढीवर परिणाम करणारी बाब असू शकते यासाठी बालरोगतज्ज्ञ कडून योग्यवेळी योग्य उपचार करून घेणे गरजेचे आहे.
7 ) 10 वर्षे ते 14 वर्षे – किशोरवयीन अवस्था. या अवस्थेत मध्ये मुलामुलींना स्वतःची काळजी घ्यावी याची समज आलेली असते त्यामुळे त्यांना त्यांच्या आहाराच्या बाबतीत मार्गदर्शन केले तर ते याचा अंतर्भाव करतात व सल्ला नुसार वागतात असे दिसून आलेले आहे.
1 )वडापाव, चहा ,शीतपेय, अतिरिक्त चॉकलेट अशा पदार्थांचा आहारात समावेश नसावा याबाबतीत पालकांनी जागरूक असणे गरजेचे आहे.
8 ) – 14 वर्षे ते 16 वर्षे

1 )या अवस्थेत मुलामुलींच्या शरीरात हार्मोन्स बदल होत असतात त्यामुळे या वयोगटातील मुलांमध्ये उंची वाढणे, आवाजातील बदल, शारीरिक बदल होत असतात.त्याचे पालकांनी जाणिपूर्वक लक्ष देऊन त्याचे शंका निरसन करणे गरजेचे आहे. कारण ही अवस्था अशी असते की ते लहान मुलांमध्ये ही वर्गीकृत होत नसतात व ते मोठ्या प्रौढ व्यक्तीही नसतात त्यामुळे त्यांच्या वाढीच्या समस्या सोबत शारीरिक व मानसिक आधार देणे महत्त्वाचे असते.
2 )तसेच विविध समस्या, लघवी मार्गातील जंतुसंसर्ग या समस्या बालरोगतज्ज्ञकडून उपचार करून घेणे गरजेचे असते.
3 )या वयात जर मुलगामुलगी उंची मध्ये कमी असल्यास बालरोगतज्ज्ञचा विविध आजाराच्या निदानासाठी सल्ला महत्वचा ठरतो.

( सदर लेखातील मते ही पूर्णपणे लेखकाची आहेत. )

जाहिरात Extra

Video Advertisement

2 thoughts on “लहान मुलांमधील वाढीच्या समस्या व त्याची कारणे व त्याचे निराकरण भाग क्रमशः दोन..

Leave a Reply

Your email address will not be published.

FM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन डबल क्लिक करा

ताज्या बातम्या