राजकारणाची हवा कोणत्या दिशेने हे पाहून सत्येचं स्वप्न पाहावं – रामदास आठवले केंद्रीय समाजकल्याण मंत्री

1,597 Views

सोलापूर । प्रतिनिधी

 आज सोलापूर मध्ये केंद्रीय समाजकल्याण न्यायमंत्री रामदासजी आठवले नॉर्थ कोट मैदानावर आर पी आय चा महामेळाव्यासाठी आले होते. सभेपूर्वी त्यांनी पत्रकारशी संवाद साधला .वंचित बहुजन आघाडीचा जास्तीत जास्त फायदा हाभाजपलाच होणार आहे. त्यामुळे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी बाहेर राहून फायदा करून देण्यापेक्षा थेट एकत्र येउन भाजपला फायदा करून द्यावा असे सांगत, केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आंबेडकरांनी सत्ता कशी मिळवावी हे माझ्याकडून शिकावे, असा खोचक सल्ला अ‍ॅड. आंबेडकर यांना दिला आहे. रिपाइंच्यावतीने आयोजित महामेळाव्यासाठी ना. आठवले शनिवारी सोलापुरात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

प्रकाश आंबेडकर यांनी वंचित आघाडीच्या माध्यमातून सत्तेचे स्वप्न पाहू नये, मागासवर्गीय मतांचे विभाजन होणार असल्याने त्याचा फायदा भाजपा – शिवसेनेला होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने स्थापन केलेल्या वंचित आघाडीत सर्व जातीच्या नेत्यांना सामावून घेतले असले तरी २००९ च्या माझ्या अनुभवानुसार डोक्यात हवा व पैसा असणारे लोकच वंचित आघाडीकडे जातील़ त्यामुळे या आघाडीला फारसे यश मिळणार नाही, असे आठवले म्हणाले़. रिपाइं व वंचित आघाडीचा राजकीय समझोता  होऊ शकेल काय? असे विचारले असता आठवले म्हणाले, ऐक्याची माझी तयारी आहे, मागे दोन ते तीन वेळा असे प्रयत्न झाले आहेत़ प्रकाश आंबेडकर याच्या नेतृत्वाखाली मी काम करण्यास तयार आहे, पण सत्तेची स्वप्न पाहताना राजकारणाची हवा कोणत्या बाजूने सुरू आहे, ते पाहून निर्णय घेतला पाहिजे.

जाहिरात Extra

Video Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

FM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन डबल क्लिक करा

ताज्या बातम्या