सोलापुरातील उळे गावानजीक दरोडेखोरांचा धारदार शस्त्राने पोलिसांवर हल्ला-पो.नि.पाटील जखमी.


सोलापूर । प्रतिनिधी
आज पहाटेच्या सुमारास सोलापूर जिल्ह्यातील उळे गावाजवळ पोलिसांवर काही दरोडेखोरांकडून हल्ला करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, पकडलेल्या एका दरोडेखोराला सोडविण्यासाठी हा हल्ला झाल्याचे समजले.पहाटेच्या सुमारास उळे गावाजवळ गस्त घालताना तालुका पोलीस स्टेशनच्या पोलिसांना पाच ते सहा दरोडेखोर दिसले. पोलिसांनी त्यांचा संशय आला असता, एकाला पकडून गाडीत घालत असताना, तो दरोडेखोर पोलिसांना ‘साहेब. चुकले ,’ म्हणून विनवणी करत असताना त्याच्यासह इतर सहकाऱ्यांनी हातातील धारदार तलवारीने पोलीस निरीक्षक विजय पाटील यांच्या हातावर आणि मांडीवर तलवारीने हल्ला केला.विजय पाटील जखमी झाले. तसेच दरोडेखोरानी दगडफेकही केली.

तेव्हा पाटील यांनी स्वरक्षणसाठी गोळीबार केला. त्यात एक आरोपी गंभीर जखमी झाला त्याला सोलापूर जिल्ह्यातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असता डॉक्टरनी दरोडेखोर मृत घोषित केले.या हल्लात दोन पोलीस देखील जखमी झाले,असून घटनास्थळी सकाळी दोन कार गाड्या उभ्या होत्या व त्या गाडीची काच फुटलेली दिसत होती. दोन्ही गाड्या तालुका पोलीस स्टेशनच्या ताब्यात आहेत.

Thank you for great information. Hello Administ . ofis taşıma