संडे स्पेशल :- संपादकीय पेंढाऱ्याला पुढाऱ्याची साथ !


पेंढाऱ्याला पुढाऱ्याची साथ
आजच्या चालू काळात देशाला भ्रष्टाचार या संसर्गजन्य रोगाने पछाडले आहे.आणी हा रोग सहसा बरा होणाऱ्यातला नाही एव्हाना तो बरा होऊच शकत नाही कारण या रोगातून एक एक असे काही पेंढारी तयार झालेले आहेत की, त्यांना आपल्या आजूबाजूला असणाऱ्या जनतेची जरासुद्धा पर्वा राहीली नाही.आता हे पेंढारी म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून शासकीय अधिकारी,कॉन्ट्रॅक्टदार,टेंडरमन
या सारखे दिग्गज मंडळी यामध्ये येतात.आता हे सुध्दा विशेष सांगण्या सारख नाही की यांची ही एक गुप्त युनीटी असते ,आणी अशा पेंढाऱ्यांचं फोफावत असतं कारण अशा पेंढाऱ्यांना पुढाऱ्यांची साथ असते.
समाजातील पुढारी चांगला असेल तरच सर्व गोष्टी ठीक व नियमात घडतात ,मग तो पुढारी कोणत्याही समाजाचा असो.
भ्रष्टाचार विरोधी कायदा आहे पण त्याची कडक अंमलबजावणी होत नाही असा एक सूर आहे. त्यासाठी कायद्यात बदल करावेत का? सरकारी/खाजगी/जनलोकपाल बील आणावे का? जनलोकपाल बिलाला देशभरातील तरुणाईने भरभरून प्रतिसाद दिला, परंतू पुढे काय? अश्याने भ्रष्टाचार बंद होईल का? हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. बऱ्याच नागरिकांना भारतीय संविधानाने दिलेले मुलभूत हक्क सुद्धा माहित नाहीत.

नुसते कायदे करून प्रश्न सुटील असे वाटत नाही. वेगवेगळे कायदे आहेत पण काय उपयोग? ते फक्त मोडण्यासाठीच असतात असा जनमानसाचा समाज आहे. कायद्याचे पालन झाले असते तर सर्वत्र आनंदीआनंद व रामराज्य अवतरले असते. पण तसे होताना दिसत नाही. भ्रष्टाचारापासून, भ्रूणहत्या, स्त्रियांचे लैंगिक शोषण, अत्याचारा विरुद्ध कायदे असून असे प्रकार धाडतातच ना? कायद्याला पळवाटा असतात. जरी कायद्याची कडक अंमलबजावणी केली तरी शिक्षा भोगून झाल्यावर किंवा दंड भरून झाल्यावर किंवा जामिन्यावर सुटल्यावर परत हीच कृत्ये करायला मोकळे.
जोवर राज्यव्यवस्था व जनामासांची भ्रष्टाचाराबद्दल्लची मानसिकता बदलत नाही, मन, बुद्धी व हृदयातून भ्रष्टाचारच्या विषवाल्लींना जाळले जात नाही, भ्रष्टाचाराच्या कल्पना किंवा वास्तव पुसले जात नाही आणि तशी कृती होताना दिसत नाहीत तसेच देश व जनतेप्रती आपुलकी, सत्य आणि प्रेमाची भावना जागृत होत नाही तोवर भ्रष्टाचार चालूच राहणार असे पेंढारी
