पॅकेजची चाळ
1,979 Views

संडे स्पेशल – संपादकीय – पॅकेजची चाळ !

आज सर्वत्र लोकसभा निवडणुकीचं वारं वाहताना दिसत आहे. सर्वच राजकीय पक्षाचे नेते इकडे तिकडे बेडकासारखं उड्या मारत आहेत. बाकीचं दुसरं तिसरं काही नाही फक्त आणि फक्त सत्ता काबीज करण्यासाठी.खरंतर ते आपल्याला आपले हक्क मिळवून देण्यासाठी आम्ही मैदानात उतरलो आहे असे वारंवार सांगत असतात ,पण तरीही दुर्दैवाने ते आपल्याला आपलेसे वाटत नाहीत.का?याचा विचार करायची याहून अधिक योग्य वेळ नाही असं वाटलं आणि हा लेख लिहायला घेतला.
अलीकडे राजकारण, संसद आणि लोकशाही व्यवस्था या सगळ्या गोष्टी बाबतीत एका तुच्छतेन पाहिलं जातं. विशेषतः मध्यमवर्गामध्ये भारतात लोकशाही व्यवस्थेने काही साध्य करता येईल असे त्यांना वाटत नाही. एकप्रकारे अविश्वासाच वातावरण त्यांच्यात निर्माण झालेलं दिसत आहे. आणि पुढील काळात तो वाढत जाण्याचा मोठा धोका आहे.संसदीय लोकशाही व्यवस्था जितकी सक्षम करायला हवी होती, तेवढी ती देशातील राजकीय समुदायाला करता आलेली नाही.
देशात सध्या राजकारणी आणि उद्योजक यांचे साटेलोटे जमले आहे आणि नोकरशाही त्यांना मदत करते आहे.आणि या सर्व दिग्गजांचा लोकांची मतं कशी विकत घेता येतील या गोष्टी कडे कल असतो.आणि त्यासाठी ते पत्रकारांच्या सुद्धा पायात पॅकेजची चाळ बांधायला कमी करत नाहीत. आणि हा आचारसंहितेचा काळ म्हणजे काही पत्रकारांच्या घरचा दिवाळसणच.उमेदवाराने दिलेली पॅकेजची चाळ पायांत बांधायची आणि उमेदवाराने नाच म्हणेल, तसं थुई-थुई नाचायचं आणि लोकांच्या डोळ्यासमोर दुसरं चित्र उभ करून त्यांच्या विश्वासाचा खून करायचा.

पॅकेजची चाळ
                                पॅकेजची चाळ

थोडया फार स्वार्थासाठी एवढं पण भान ठेवून चालत नाहीत की, उद्या निवडून येणारी व्यक्ती खरंच लोकांच्या मदतीला धावून येईल का? त्यांना उपयोगी पडेल का? आपला स्वार्थ किती लोकांचं वाटूळ करेल.
 एखाद्या नेत्याने जर काही मीडियाबद्दल बोललेच,तर सर्वच्या सर्व मीडियाने एकत्र येऊन त्यांच्यावर हल्लाबोल करणे ही कुठली पत्रकारिता आली त्यांना काही तरी जाणवलं असेल, उगाचच कोणी कशाला एखाद्या वर आरोप करेल.आणि sorry बरं का, मी समाजातील त्या प्रत्येक सुशिक्षित व्यक्तीला जबाबदार धरतो जे खोटा प्रचार करतात, जे अपप्रचाराने जनतेची दिशाभूल करतात.
सामान्य माणसाला आता भरपूर जरी कळत असलं, तरी त्याची व्यवस्थित जडणघडण होत नाही कारण बहुतांश वेळा राजकीय लिंक त्याच्या प्रगतीस आळा घालते.पण आता वेळ आली आहे जागृत होण्याची, संसदीय लोकशाहीची घुसळण थांबविण्याची,योग्य तो विचार करून अराजकाकडं येण्याची, नाहीतर डॉ.अब्दुल कलाम यांचं 2020 पर्यंत भारताला महासत्ता बनवण्याचं जे स्वप्न होतं ते अजून किती वर्षांनी पूर्ण होईल याचा सुद्धा अंदाज वर्तवता येणार नाही वा ते एक दिवास्वप्न राहील.

जाहिरात Extra

Video Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

FM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन डबल क्लिक करा

ताज्या बातम्या