पंढरपूरातील पूरग्रस्तांना तात्काळ मदत द्या; केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदासजी आठवलेंनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना आदेश


सोलापूर व्हायरल । प्रतिनिधी पंढरपूर मध्ये काही दिवसापूर्वी उजनी धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे चंद्रभागेला पूर आला होता. पुराचे पाणी पंढरपूर शहरातील सखल भागांमध्ये शिरले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर ,कुष्ठरोग वसाहत , रोहिदास चौक, गोंधळ गल्ली, विठ्ठलनगर ,बंकटस्वामी मठ परिसर ,कालिकादेवी चौक ,गुजरात कॉलनी ,उमदी पटांगण, जगदंब वसाहत, रमाई आंबेडकर नगर ,नागपूरकर मठ, विप्रदत्त घाट, भाई भाई चौक इत्यादी घरांमध्ये पाणी शिरून घराचे व संसार उपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले होते. महसूल विभागाच्या व नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याकडून सदर भागातील रहिवाशांचे पंचनामे होऊन देखील ते आर्थिक मदतीपासून वंचित आहेत.

मागील एक महिन्यापासून पंढरपूर मध्ये पूरग्रस्त वरून राजकारण चालल्याचे चित्र आपल्याला दिसत आहे, तर प्रशासनाकडून चेहरा बघून आर्थिक मदत केल्याचा आरोप तेथील रहिवाशांचा आहे. जवळपास एक महिना होऊन देखील तेथील रहिवाशांना पूरग्रस्त निधी मिळाला नाही. आंबेडकर नगर सह सर्व झोपडपट्टीमध्ये रहिवाशांना सरसकट मदत मिळावी यासाठी नगरसेवक डी.राज सर्वगोड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील,मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांना निवेदन दिले,
तसेच केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदासजी आठवले साहेब यांना निवेदन दिले, यावेळी नामदार रामदास आठवले साहेब यांनी सोलापूर जिल्ह्याचे कलेक्टर यांना फोन करून सर्व पूरग्रस्तांना आर्थिक मदत मिळावी असे सांगितले तर अविनाश महातेकर सामाजिक न्यायमंत्री यांनी प्रांतअधिकारी सचिन ढोले यांना फोन करून आंबेडकर नगरसह पंढरपुरातील सर्व पूरग्रस्तांना मदत मिळावी असा आदेश दिला. अशी माहिती नगरसेवक डी.राज सर्वगोड यांनी सोलापूर व्हायरलला दिली. यावेळी प्रवीण माने हे देखील उपस्थित होते.
