सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का ,भाजपचे वर्चस्व कायम!

1,694 Views

सोलापूर ।  प्रतिनिधी

सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक काल मंगळवारी दुपारी सोलापूर जिल्हा परिषद यशवंतराव चव्हाण सभागृहात झाली ही निवडणूक मोहिते पाटील व परिचारक यांच्या साठी प्रतिष्ठेची मानली जात होती.यामध्ये भाजप पुरस्कृत व समविचारी गटाच्या बाजूने अध्यक्ष पदासाठी मोहिते पाटील गटाचे उमेदवार अनिरुद्ध कांबळे हे 7 मतांनी विजय झाले तर महाविकास आघाडीचे उमेदवार त्रिभुवन धाईजे यांना 29 मते मिळाली आणि त्याचा पराभव झाला.

सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का ,भाजप चे वर्चस्व कायम
सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का ,भाजप चे वर्चस्व कायम

तर उपाध्यक्ष पदासाठी समविचारी आघाडी आवताडे गटाचे उमेदवार दिलीप चव्हाण यांनी महाविकास आघाडी चे उमेदवार बाळराजे पाटील यांचा पराभव केला. चव्हाण यांना 35मते तर पाटील यांना 31 मते मिळाली
आणि सोलापूर जिल्हा परिषद वर पुन्हा एकदा भाजप ने मोहिते पाटील व परिचारक आणि आवताडे गटाच्या सहाय्याने जिल्हा परिषदचा झेंडा रोवला

सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का ,भाजप चे वर्चस्व कायम
सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का ,भाजप चे वर्चस्व कायम

सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची जबाबदारी माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोहिते पाटील व परिचारक यांच्या वर दिली होती आणि मोहिते पाटील व परिचारक यांनी समविचार आघाडी सोबत घेऊन आणि देखील काही मेळ लागत नव्हता त्यावेळी
आवताडे गटाची भूमिका देखील तितकीच महत्वाची होती मात्र आवताडे गटाने दोन्ही ही पक्षांकडे होती मात्र  मोहिते पाटील व परिचारक यांनी आवताडे गटाला उप अध्यक्ष पद देऊन सोबत घेत सोलापूर जिल्हा परिषद वर भाजपचा झेंडा रोवला
आणि जिल्हा परिषद वर भाजप सत्ता येताच मोहिते पाटील आणि परिचारक यांनी पुन्हा एकदा सोलापूर जिल्हा वर वर्चस्व असल्याचे दाखवून दिले
त्यामुळे जिल्हाच्या राजकारणात मोहिते पाटील आणि परिचारक हे किंगमेकर ठरले अशी चर्चा सध्या नागरिकांतून होत आहे.

जाहिरात Extra

Video Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

FM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन डबल क्लिक करा

ताज्या बातम्या