पंढरपूर शहरात आणि ग्रामीण भागात जोरदार अवैध वाळू उपसा चालू मात्र पोलीस प्रशासन वाळूचा मलिदा खाण्यास व्यस्त ?


पंढरपूर :- प्रतिनिधी
पंढरपूर भीमानदी मध्ये दिवसा ढवळ्या जोरदार अवैध वाळू उपसा चालू असून ,वाळू माफियांनी भीमानदी जवळपास पोखरून सोडली आहे.
वाळू माफियांना जादा पैसे मिळत असल्याने त्यांना सुगीचे दिवस आले आहे तर महसूल प्रशासनाचे आणि पोलीस प्रशासनच्या अर्थपूर्ण दुर्लक्षमुळे भीमा नदी पात्रात दिवसरात्र वाळू उपसा सुरू आहे. शासनाने वाळू उपसा बंदी घातली असताना आणि कोणत्याही प्रकारचे वाळूचे टेंडर निघाले नसतांना देखील, पंढरपूर आणि पंढरपूर तालुक्यातील आसपास च्या गावात वाळू राजरोसपणे वाळू उपसा सुरू असल्याचे आपल्याला दिसत आहे.

गेल्या दोन वर्षेपासून शासनाने वाळू उपशावर बंदी घातली असल्याने, सोलापूर जिल्ह्यात देखील वाळू उपसा बंदी आहे. वाळू उपसा बंदी असली तरी वाळू माफियांनी पंढरपूर तालुक्यातील भीमा नदी पात्रातील आसपासच्या गावामध्ये वाळू उपसा जोरदार सुरु ठेवला आहे वाळू उपसा मध्ये ताजा पैसा मिळत असल्याने जीवाची बाजी लावून युवा तरुण पिढी या धंद्यात उतरताना आपल्या दिसत आहे.
तसेच पंढरपूर व आसपासच्या ग्रामीण भागात महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनांची धास्ती व भीती वाळू माफिया मध्ये राहिली नसल्याने दिवस रात्र अवैध वाळू उपसा भीमा नदी पात्रातून चालू आहे. त्याचप्रमाणे मुढेवाढी,चळे,आंबे,या आसपास च्या गावात देखील वाळू उपसा जोरदार चालू आहे त्यामुळे भीमा नदी पात्रात अंघोळीसाठी आलेल्या भावीक आणि स्थानिक नागरिकांचे जीव धोक्यात येऊ शकतो.
महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनाने लक्ष घातले तर पंढरपूर भीमा नदी पात्रातील वाळू उपसा थांबू शकतो. आणि शासनाचा बुडणार महसूल बऱ्यापैकी थांबण्यास मदत होणार आहे. मात्र महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन भीमा नदी पात्रातील वाळूचा मलिदा खाण्यास व्यस्त आहेत अशी चर्चा स्थानिक नागरिक आणि ग्रामीण भागातून चालू आहे.
