बादशहा खाऊ देईना…. आणि राणी झोपू देईना, पोलीस प्रशासन “तेरी भी चूप,मेरी भी चूप ” पंढरी तीर्थक्षेत्र नसून लवकरच मटका क्षेत्र म्हणून ओळखले जाणार….?


पंढरपूर :- प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्याचे पंढरपूर हे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते मात्र अशा या तीर्थक्षेत्र मध्ये मटक्याचा सुळसुळाट सुरु झाला आहे. या मटक्याच्या मोहमध्ये तरुणाई अडकली असून अनेकांचे संसार यामध्ये उध्वस्त होण्याची भीती सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे मटक्याच्या बाजाराकडे स्थानिक पोलिसांनी गांभीर्याने लक्ष देऊन बिमोड करण्याची गरज पंढरपूर शहरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. शहरात गेल्या अनेक दिवसांपासून खुलेआम असलेल्या कल्याण – मुंबई मटक्याने शहरात मोठ्या प्रमाणात जोर धरून धुमाकूळ घातला आहे. कष्ट न करता झटपट श्रीमंत होण्याच्या नादात शहरातील तरुण व युवा वर्ग या वाममार्गाकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होताना दिसून येत आहे तर मटका-बुकी मालक गबरगंड झाल्याचेही चित्र पहायला मिळत आहे.

बादशहा खाऊ देईना…. आणि राणी झोपू देईना अशी स्तिथी सध्या शहरातील मटक्याच्या नादी लागून व्यसनधीनतेच्या आहारी गेलेल्या अनेक तरुण व युवक वर्गाची झालेली पहायला मिळत आहे तर काही युवक कर्जबाजारी होऊन उध्वस्त झाल्याचे चित्र आहे ,मात्र या मटक्याला खुलेआम चालविण्यासाठी अभय कोणाचे …? हा प्रश्न पंढरपूर शहरातील स्थानिक नागरिकांना सतावत आहे , तर शहरात मटका जोरदार चालू असताना देखील पोलीस प्रशासन असे दुर्लक्ष का करीत आहेत ? का पोलीस प्रशासन ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप अशी भूमिका घेत आहे ? का ? असा सवाल सर्वसामान्य जनतेला पडला आहे , तसेच पंढरपूर शहरातील खुलेआम चालणार मटका बंद व्हवा आशी मागणी जनतेमधून होत आहे. नाही तर पंढरपूर हे तीर्थक्षेत्र नाहीतर मटका क्षेत्र म्हणून ओळखले जाईल अशी चर्चा देखील नागरिकांमधून चालू आहे.
