उपनगराध्यक्ष पदा नंतर आता लवकरच स्वीकृत नगरसेवकांच्या बदल्या

198 Views

पंढरपूर :- प्रतिनिधी

मागील दोन दिवसापूर्वी माझी उपनगराध्यक्ष लतिका डोके यांनी त्यांचा उपनगराध्यक्ष पदाचा दीड वर्षाचा कालावधी संपला म्हणून राजीनामा दिला होता.पंढरपूर शहर विकास आघाडीच्या वतीने आज 7 फेब्रुवारी रोजी नगरपालिकेची उपनगराध्यक्ष पदाची रिक्त जागा भरण्यात आली परिचारक गटांकडून नगरसेवक अनिल अभंगराव यांची उपनगराध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली.

उपनगराध्यक्ष पदा नंतर आता लवकरच स्वीकृत नगरसेवकांच्या बदल्या
उपनगराध्यक्ष पदा नंतर आता लवकरच स्वीकृत नगरसेवकांच्या बदल्या

तर स्वीकृत नगरसेवक लवकरच राजीनामा देणार असल्याची चर्चा जोरदार चालू आहे, मागील दीड वर्षांपूर्वी 2018 साली आ. परिचारक यांनी विधानसभेच्या तोंडावर मराठा व धनगर मते मिळवण्यासाठी स्वीकृत नगरसेवकाच्या बदल्या केला होत्या असे नागरिकांमधून बोले जात आहे. त्यामध्ये श्रीनिवास बोरगावकर, आदित्य फत्तेपुकर व मालोजी शेंबडे यांना परिचारक गटाने संधी दिली होती आता मात्र या तिन्ही नगरसेवकांचा स्वीकृत नगरसेवकाचा कालावधी संपला असून ते राजीनामा देणार का ?नाही याकडे जनतेचे लक्ष लागले आहे तर पंढरपूर नगरपालिकेची किल्ली परिचारकांकडे असल्यामुळे मालक बोले आणि नगरसेवक हाले अशी स्थिती नगरपालिकेची आहे. त्यामुळे श्रीनिवास बोरगावकर, आदित्य फत्तेपुकर व मालोजी शेंबडे राजीनामा देतील व लवकरच स्वीकृतच्या बदल्या होतील अशी चर्चा जोरदार चालू आहे.

जाहिरात Extra

Video Advertisement

2 thoughts on “उपनगराध्यक्ष पदा नंतर आता लवकरच स्वीकृत नगरसेवकांच्या बदल्या

  1. Thank you, I have just been searching for information approximately this topic for ages and yours is the greatest I’ve discovered so far. However, what in regards to the conclusion? Are you sure in regards to the source?|

Leave a Reply

Your email address will not be published.

FM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन डबल क्लिक करा

ताज्या बातम्या