स्वीकृत नगरसेवक साठी युवकांची उत्सुकता शिगेला, परिचारकांची भूमिका अस्पष्ट


पंढरपूर:-प्रतिनिधी
पंढरपूर नगरपालिका स्वीकृत नगरसेवकांच्या तीन जागा रिक्त असून आ. परिचारक गटाने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नाही .मागील काही दिवसापूर्वी माझी उपनगराध्यक्ष लतिका डोके यांनी त्यांचा उपनगराध्यक्ष पदाचा दीड वर्षाचा कालावधी संपला म्हणून राजीनामा दिला होता.पंढरपूर शहर विकास आघाडीच्या वतीने 7 फेब्रुवारी रोजी नगरपालिकेची उपनगराध्यक्ष पदाची रिक्त जागा भरण्यात आली होती परिचारक गटांकडून नगरसेवक अनिल आभंगराव यांची उपनगराध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली.
तर तीनही स्वीकृत नगरसेवक यांनी राजीनामा दिला आहे, मागील दीड वर्षांपूर्वी 2018 साली आ. परिचारक यांनी विधानसभेच्या तोंडावर मराठा व धनगर मते मिळवण्यासाठी स्वीकृत नगरसेवकाच्या बदल्या केला होत्या. असे नागरिक मधून बोले जात आहे. त्यामध्ये श्रीनिवास बोरगावकर, आदित्य फत्तेपुकर व मालोजी शेबडे यांना परिचारक गटाने संधी दिली होती

आता मात्र या तिन्ही नगरसेवकाचा स्वीकृत नगरसेवकाचा कालावधी संपला असून त्यांनी राजीनामा दिला आहे तर पंढरपूर नगरपालिकेची किली परिचारकांन कडे असल्यामुळे मालक बोले आणि नगरसेवक हाल्ले अशी स्थिती नगरपालिकाची आहे तरी देखील पंढरपूर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष उमेश परिचारक यांची भूमिका अजून तटस्थ आहे.तसेच स्वीकृत नगरसेवक पदासाठी अनेक युवक नेते इच्छुक असून , दलित,मुस्लिम, कोळी,मातंग या समाजातील एकाला संधी मिळणार आशी चर्चा नागरिका मधून चालू आहे.त्यामुळे पुढील आठवड्यात होणाऱ्या स्वीकृत नगरसेवक पदाच्या बदल्यात परिचारक गट हे जातीचे राजकारण करणार का ? याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
