तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेमध्ये कर्मयोगी विद्यानिकेतन,पंढरपूरचे उत्तुंग यश

तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेमध्ये कर्मयोगी विद्यानिकेतन,पंढरपूरचे उत्तुंग यश
340 Views

पंढरपूर :- प्रतिनिधी

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या 390 व्या जयंतीनिमित्त कर्नल भोसले चौक, पंढरपूर येथील शिवजन्मोत्सव समितीतर्फे घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेमध्ये इयत्ता पाचवी ते सातवीच्या गटात कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर प्रशालेच्या कुमारी भक्ती गणेश पवार हिने पंढरपूर तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला.
संपूर्ण महाराष्ट्राची अस्मिता व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची संकल्पना साकारून सामान्य माणसाच्या मनामध्ये जिद्द व मनगटा मध्ये बळ निर्माण केले. सामान्य माणसाला स्वाभिमानाने जगायला व अन्यायाविरुद्ध लढायला शिकवले अशा महान राजाचा सर्व जगालाच अभिमान आहे. या क्षणाचे औचित्य साधून कर्नल भोसले चौक, पंढरपूर येथे शिवजन्मोत्सव सोहळा समिती गेली दहा वर्षे चित्रकला स्पर्धेचे आयोजन करतात. सालाबादप्रमाणे याहीवर्षी घेण्यात आलेल्या या चित्रकला स्पर्धेमध्ये पंढरपूर तसेच तालुक्यातील सर्व शाळांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला होता. यामध्ये कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर या प्रशालेची इयत्ता सहावीतील स्पर्धक कु.भक्ती गणेश पवार हिने बाजी मारत या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला, या यशाबद्दल तीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या विद्यार्थीनीस चित्रकला शिक्षक श्री नारायण कुलकर्णी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेमध्ये कर्मयोगी विद्यानिकेतन,पंढरपूरचे उत्तुंग यश

यशस्वी विद्यार्थीनीचा प्रमाणपत्र देवून सत्कार करताना मा.नगराध्यक्ष नागेश भोसले व मान्यव

चित्रकला सर्वच क्षेत्रांचा पाया असुन त्याकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहणे महत्वाचे आहे. पुर्वीच्या काळी होणारे किल्ल्यांचे बांधकाम त्याची रचना हे सुद्धा करताना चित्रकलेचा फार मोठा आधार आहे. त्याचबरोबर कर्मयोगी विद्यानिकेतनमध्ये शनिवार व रविवार चित्रकलेचे ज्यादा तास घेतले जातात. त्याच अनुषंगाने कु.भक्ती गणेश पवार इ.६ वी हिने चित्रकलेमध्ये उत्तुंग यश मिळविले. तसेच क्रीडा, आभ्यास यामध्येही तीने प्राविण्य मिळविलेले आहे.
यावेळी प्रशालेचे संस्थाध्यक्ष मा.आ.श्री प्रशांत परिचारक यांनी अभिनंदन करुन कौतुकाची थाप टाकली व तीच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच प्रशालेच्या प्राचार्या सौ शैला कर्णेकर व रजिस्ट्रार श्री गणेश वाळके यांनी विजेत्या विद्यार्थीने अभिनंदन करुन पुढील होणा-या स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. यावेळी ऑफीस इन्चार्ज श्री सावंत व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कु.भक्तीला शुभेच्छा दिल्या.
फोटो ओळ – यशस्वी विद्यार्थीनीचा प्रमाणपत्र देवून सत्कार करताना मा.नगराध्यक्ष नागेश

जाहिरात Extra

Video Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

FM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन डबल क्लिक करा

ताज्या बातम्या