राष्ट्रवादीच्या नाराज कार्यकर्त्यांनी घेतली समाधान आवताडे यांची गुप्त भेट

2,466 Views

पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे 11 वर्ष प्रतिनिधित्व करणारे आमदार कैलासवासी भारत भालके यांचे 28 नोव्हेंबर रोजी अकाली निधन झाले या जागेसाठी पोट निवडणुक लागणार आहे, रिक्त झाल्यापासून 6 महिन्यात पोटनिवडणुक घ्यावी लागणार त्यामुळे पोलीस, महसूल आणि निवडणूक आयोग या पोटनिवडणुकीच्या कामाला लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची प्रशासकीय तयारी सुरू झाली आहे. मार्च महिन्यात दुसऱ्या आठवड्यात निवडणूक जाहीर होण्याची अपेक्षा असून एप्रिल मध्ये मतदान होण्याची शक्यता व्यक्त होत आहे, सध्या मतदारसंघातील मतदान केंद्र त्यांची संख्या, मतदारसंघातील, संवेदनशील, गावे तसेच मतदार यादी तयार करण्यात येत आहेत

राष्ट्रवादीच्या नाराज कार्यकर्त्यांनी घेतली समाधान आवताडे यांची गुप्त भेट
राष्ट्रवादीच्या नाराज कार्यकर्त्यांनी घेतली समाधान आवताडे यांची गुप्त भेट

तर दुसरीकडे काल आमदार भारत भालके यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली, यावेळी 22 गावे व शहरातील कार्यकर्त्यांच्या विचारविनिमय घेण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेत्यांकडून मातब्बर नेत्यांची पार्श्वभूमी पाहून त्यांचे स्वागत केले जाईल असे स्पष्टीकरण दिले गेले. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नाराज जेष्ठ मंडळींनी पंढरपूर मंगळवेढ्याचे मातब्बर नेते समाधान आवताडे यांची गुप्त भेट घेऊन राजकीय चर्चा करण्यात आल्याचे , विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहिती वरून समजते.
समाधान आवताडे हे पंढरपूर दौऱ्यावर आले असता त्यांनी जेष्ट नगरसेवक नाना कदम यांची पंढरपूर येथील विठ्ठल हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली
त्यांच्यावर विठ्ठल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्यांची विचारपूस करण्यासाठी आवताडे आले होते, त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे काही जेष्ठ नेत्यांनी अवताडे यांची भेट घेतली
यामुळे भेटीमुळे राष्ट्रवादी मधे अंतर्गत वादाचे परिणाम लवकरच दिसून येतील
राष्ट्रवादी काँग्रेस चे संभाव्य उमेदवार असलेले भगीरथ भालके यांना या नाराज गटाचे बंड शमवण्यासाठी तारेवरची
कसरत करावी लागणार हे निश्चित

जाहिरात Extra

Video Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

FM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन डबल क्लिक करा

ताज्या बातम्या