गाळा वाटपावरून सत्ताधारी व पालिकेकडून गोरगरिबांची कुचेष्टा

पंढरपूर : प्रतिनिधी

पंढरपूर नगरपालिकेडून गुजराती कॉलनी येथील नगरपालिकेच्या मालकीच्या गाळ्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये 46 गाळ्यांपैकी 10 ते 12 गाळे हे नगरपालिकेच्या नगरसेवकांनी सत्ताधाऱ्यांच्या हातचे बोट धरून स्वतःच्या पदरात पाडून घेतल्याचे चित्र दिसत आहे.

उर्वरित गाळ्यांमध्येही गोरगरीबांना अजिबातच स्थान मिळालेले नाही, त्यामुळे अशा जीवघेण्या काळातही सत्ताधाऱ्यां कडून पालिकेकडून, आणि नगरसेवकांकाडून सामान्य जनतेची कुचेष्टा होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

गाळा वाटपावरून सत्ताधारी व पालिकेकडून गोरगरिबांची कुचेष्टा
गाळा वाटपावरून सत्ताधारी व पालिकेकडून गोरगरिबांची कुचेष्टा

कार्यकर्त्यांमध्येही नाराजीचा सूर:

इतकेच नव्हे तर परिचारक गटातील सामान्य कार्यकर्ते व इतर नगरसेवकांमधून सुद्धा नारजीचा सुर उमटत आहे.
वारंवार तेचतेच नगरसेवक त्यांचे नातेवाईक व त्यांचे बगलबच्चे आणि त्यांच्याकडे लागलेला टेंडरचा ढिगारा पाहून पक्षातील इतर नगरसेवक, सामान्य कार्यकर्ते यांच्या मध्ये नाराजीचा वातावरण पसरत असल्याचे दिसून येत आहे.

आजी-माजी नगरसेवकांमध्ये झाला होता विरोध:

गेल्या काही महिन्यांपूर्वी नगरपालिकेडुन गुजराती कॉलनी येथील गाळे, संबंधित भागातील ‘बेरोजगार तरुण’ या गोंडस नावा खाली निविदा काढण्यात आली, परंतु हि निविदा जाहीर झाल्यानंतर पंढरपूर शहर विकास आघाडीच्या काही नगरसेवकांनी आपल्या पदाचा गैरवापर करून अप्रत्यक्षपणे त्यातील काही गाळे आपले नातेवाईक व त्यांच्या बगलबच्यांच्या नावे होणार असल्याचे समजताच रिपाई नेते सुनील सर्वगोड त्यांच्या कडून या गाळ्यांच्या प्रक्रियेला विरोध करण्यात आला.
रिपाई नेते सुनील सर्वगोड यांच्या कार्यकर्त्यांकडून नगरपालिके समोर आंदोलन करण्यात आले
पण सत्ताधाऱ्यांकडून या निविदेला मंजुरी देण्यात आली नगराध्यक्षा आणि मुख्यअधिकाऱ्यांकडूनही निविदेची मजुरी देण्यात आली.
सुमारे दोन ते तीन दिवसांखाली नगरपालिकेचे गाळे वाटप जाहीर झाले, त्यात गोरगरीबांना ऐवजी धनदांडगे नगरसेवक, त्यांचे नातेवाईक आणि बगलबच्चे यांना प्राधान्य देऊन गाळ्याचे वाटप करण्यात आले.       सत्ताधारी आमदार प्रशांत परिचारक व नगरपालिकेकडून पंढरपूरातील गोरगरीब, सुशिक्षित बेरोजगार या नावाखाली गोरगरीबांची कुचेष्टा व धनदांडग्याचीच भरती होत असल्याची चर्चा सध्या कोरोना काळात चोरून चौकाचौकांत थांबलेल्या लोकांमध्ये आणि गाव कट्टा पातळीवर आणि नाराज कार्यकर्त्यांमधील फोन कॉल्सवर होत असल्याचे चित्र सध्या स्पष्ट दिसून येत आहे.

जाहिरात Extra

Video Advertisement

FM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन डबल क्लिक करा

ताज्या बातम्या