प्रहार संघटना पालकमंत्र्यांना रोखणार

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर शहर व जिल्ह्यात मरीआई समाजाचे लोक मोठ्या प्रमाणात रहात आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून सदर समाजावर
वेगवेगळ्या प्रकारे अन्याय होऊ लागलेला आहे. मरीआई समाजाचे लोक अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मोहोळ, सांगोला, माळशिरस, मंगळवेढा या तालुक्यात मोठ्याप्रमाणात रहात असून या समाजाला तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी न्याय देत सोलापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात मोठ्याप्रमाणात समाजातील नागरिकांचे मेळावे भरून त्या ठिकाणी त्यांना ‘जातीचे दाखले’ बहाल केलेले आहे. परंतु त्यानंतर मात्र शासकीय कर्मचारी व अधिकारी हे मरीआईवाले (मरगम्मा) समाजाच्या लोकांना भटक्या विमुक्त जातीत समावेश करून त्यांना शासनाने मान्यता देवूनही दाखले न देता त्यांची पिळवणुक करू लागलेले आहे.

प्रहार संघटना पालकमंत्र्यांना रोखणार
प्रहार संघटना पालकमंत्र्यांना रोखणार

त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील सर्वच तहसील यांना याबाबत लेखी आदेश देवून ‘स्थळ पंचनामा’ करून त्यांना तात्काळ आदेश बहाल व्हावेत. ज्या लोकांकडे १९६१ पूर्वीचे पुरावे नाहीत अशा लोकांसाठी शासनाने परिपत्रक काढून त्यात ‘स्थळ पंचनामा’ करून जातीचे दाखले बहाल करणेबाबत शासन आदेशही काढलेले आहेत.
असे असताना जातीचे दाखले अद्याप मिळाले नसल्याने आज प्रहार संघटनेकडून जिल्हाधिकारी डॉ मिलिंद शंभरकर यांना निवेदन देण्यात आले.
मरीआईवाले (मरगम्मा) समाजाच्या नागरिकांना जातीचे दाखला नसल्याने अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. येत्या काही दिवसातच राज्यात मोठ्या प्रमाणात पोलिस भरती व अन्य शासकीय कार्यालयात भरती सुरु असल्याने मरीआईवाले समाजाच्या नागरिकांकडे भटक्या विमुक्त जातीचे दाखले नसल्याने त्यांना कोणत्याही भरतीत भाग घेता येत नाही त्यामुळे समाजाचा कधीही न भरून येणारा नुकसान होऊ लागलेला आहे. तरी येत्या १४ ऑगस्ट पुर्वी सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण व उत्तर सोलापूर, मोहोळ, मंगळवेढा, माळशिरस, अक्कलकोट, सांगोला या तालुक्यात मरीआईवाले (मरगम्मा) समाजाच्या नागरिकांना स्थळपंचनामा करून तात्काळ भटक्या विमुक्त जाती जमातीत समावेस करून जातीचे दाखले बहाल करावे अन्यथा १५ ऑगस्ट २०२१ रोजी पालकमंत्री यांना झेंडावंदन करित असतांना असंख्य समाज बांधवांना आणून अचानकपणे आंदोलन करणार असल्याचा इशारा प्रहार संघटनेचे शहर संपर्क प्रमुख जमीरभाई शेख यांनी दिला आहे.
यावेळी शहर प्रमुख अजित कुळकर्णी, कार्यकारी प्रमुख खालिद मणियार, सुनील पवार, तायप्पा कोळी,मशप्पा कोळी,संजय मरीआईवाले व इतर कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात Extra

Video Advertisement

FM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन डबल क्लिक करा

ताज्या बातम्या