रोहन परिचारक यांच्या उपस्थितीत कर्मयोगी विद्यानिकेतन सेमी इंग्लिश स्कुल पंढरपूर येथे “इन्व्हेस्टीचर सेरेमनी” उत्साहात साजरी

पंढरपूर: प्रतिनिधी

श्री पांडुरंग प्रतिष्ठान पंढरपूर संचलित कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेमध्ये शुक्रवार दि.०६.०८.२०२१ रोजी “इन्व्हेस्टीचर सेरेमनी” उत्साहात साजरी करण्यात आली. गेली ४ वर्षे कर्मयोगी विद्यानिकेतन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव व प्रोत्साहन देण्याकरीता निरंतर कार्यरत आहे याचे हे एक ज्वलंत उदाहरण आहे.
सध्याच्या या कोरोना कालावधीत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत असल्याचा व असे वातावरण निर्माण करुन त्यांना या काळात देखील नवनवीन उपक्रम व प्रोत्साहनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा मानस शाळा सतत करत आहे. या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणुन श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे चेअरमन मा.श्री.रोहन परिचारक तसेच प्रशालेच्या प्राचार्या सौ.सोनाली पवार, रजिस्ट्रार श्री गणेश वाळके आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करुन सरस्वती पूजनाने करण्यात आली. प्रशालेमध्ये “इन्व्हेस्टीचर सेरेमनी” मध्ये कॅबिनेट मेंबरची स्थापना करण्यात आली यामध्ये स्कुल हेड बॉय म्हणुन मास्टर मयुरेश जाधव व स्कुल हेड गर्ल म्हणुन मिस स्नेहल करचे हीची नेमणुक करण्यात आली.

रोहन परिचारक यांच्या उपस्थितीत कर्मयोगी विद्यानिकेतन सेमी इंग्लिश स्कुल पंढरपूर येथे “इन्व्हेस्टीचर सेरेमनी” उत्साहात साजरी
रोहन परिचारक यांच्या उपस्थितीत कर्मयोगी विद्यानिकेतन सेमी इंग्लिश स्कुल पंढरपूर येथे
“इन्व्हेस्टीचर सेरेमनी” उत्साहात साजरी

प्रशालेमध्ये एकून ब्लू हाऊस, ग्रीन हाऊस, रेड हाऊस व यलो हाऊस हे चार विभाग करण्यात आले यामध्ये ब्लू हाऊसची कॅप्टन मिस समिक्षा लेंडवे व व्हाईस कॅप्टन म्हणुन मास्टर विश्वजीत देठे यांची निवड करण्यात आली. ग्रीन हाऊसमध्ये ग्रीन हाऊसचा कॅप्टन मास्टर शिवम लिंगे व व्हाईस कॅप्टन म्हणुन मिस वैष्णवी उकरंडे यांची निवड करण्यात आली. रेड हाऊसचा कॅप्टन मास्टर ऋतुराज फुलारे व व्हाईस कॅप्टन म्हणुन मिस समृद्धी पवार यांची निवड करण्यात आली. यलो हाऊसची कॅप्टन मिस कांचन लिंगे व व्हाईस कॅप्टन म्हणुन मास्टर शिवम डोंगरे यांची निवड करण्यात आली. प्रशालेचा स्पोर्टस् कॅप्टन म्हणून मास्टर कैवल्य बडवे व व्हाईस कॅप्टन म्हणुन मिस आकांक्षा गायकवाड यांची निवड करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष व पांडुरंग प्रतिष्ठानचे चेअरमन मा.श्री.रोहन परिचारक यांनी सर्व विद्यार्थ्यांना बॅज लावून सन्मानित केले. इन्व्हेस्टीचर सेरेमनीचा शपथविधी प्राचार्या पवार यांनी केला. यानंतर चारीही विभागाच्या शिक्षकांनी प्रत्येक विभागांचे झेंडे विभागप्रमुखाला सन्मानपुर्वक स्वाधीन केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष व पांडुरंग प्रतिष्ठानचे चेअरमन मा.श्री.रोहन परिचारक यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर देवून या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. तसेच प्रशालेच्या प्राचार्यांनी ही त्यांचे मनोगतामध्ये अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांना सुप्त गुणांचा विकास करुन अभ्यास व खेळ यांचा समतोल कसा साधावा याचे मोलाचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ.योगीनी ताठे यांनी केले तर पाहुण्यांचे स्वागत सौ संध्या उकरंडे यांनी व पाहुण्यांचे आभार श्री जाघव यांनी केले. या कार्यक्रमास उपस्थित सर्व पालक वर्गांनी भरभरून प्रतिसाद दिला

जाहिरात Extra

Video Advertisement

FM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन डबल क्लिक करा

ताज्या बातम्या