नगरसेवक अक्षयजी गंगेकर यांच्या पाठपुराव्याने रस्त्याच्या कामाला जोरदार सुरुवात

नगरसेवक अक्षयजी गंगेकर यांच्या पाठपुराव्याने रस्त्याच्या कामाला जोरदार सुरुवात

पंढरपूर प्रतिनिधी

काल पंढरपूर प्रभाग क्रं.१ मधील अनिल नगर ते कॉटेज हॉस्पिटल कडे जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले, यावेळी कर्तव्यदक्ष नगरसेवक अक्षयजी गंगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रस्त्याचा शुभारंभ, प्रभाग क्रं.१ चे लोकप्रिय नगरसेवक प्रतापजी गंगेकर आणि अनिल नगर वार्डातील काही जेष्ठ नागरिकांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला.

नगरसेवक अक्षयजी गंगेकर यांच्या पाठपुराव्याने रस्त्याच्या कामाला जोरदार सुरुवात
नगरसेवक अक्षयजी गंगेकर यांच्या पाठपुराव्याने रस्त्याच्या कामाला जोरदार सुरुवात

मागील अनेक दिवसांपासून अनिल नगर ते कॉटेज हॉस्पिटल कडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था अतिशय वाईट झाली होती, त्याचा नाहक त्रास हा त्या वार्डातील सर्वसामान्य जनतेला होत होता.अनेक वेळा प्रशासनाकडे मागणी करून देखील त्या रस्त्याचे काम पूर्ण केले जात नव्हते.तसेच काही दिवसांपूर्वी प्रभाग क्रं.१मधील स्थानिक नागरिकांनी कर्तव्यदक्ष नगरसेवक अक्षयजी गंगेकर यांच्या कडे रस्त्याची मागणी केली असता, माजी नगराध्यक्षा व कर्तव्यदक्ष नगरसेविका सौ. राजश्रीताई प्रताप गंगेकर व स्थायी समिती सदस्य नगरसेवक श्री अक्षय प्रताप गंगेकर यांनी वेळोवेळी पाठपुरावा व कथीत परिश्रम घेऊन हा रस्ता मंजूर करून आणला, काल खडीकरण व डांबरीकरण करून रस्त्याच्या कामास सुरुवात झाली. यावेळी उपस्थित स्थायी समिती सदस्य नगरसेवक श्री अक्षय गंगेकर श्री संगम मेंबर कंकणवार, श्री. दिलीप मेंबर वाडेकर, श्री. मदन बोंडफळे, श्री. गणेश बागल, श्री. शेखर कुंदुर, श्री. नरेश पिंगळे, श्री. कुणाल गंगेकर, श्री. समाधान पोळ ,श्री. रॉक कुंदूर, श्री. लखन भिंगारे ,श्री. गणेश भोसले, श्री. नागेश सोमवंशी, मोहसीन खान, श्री राहुल भिंगारे, श्री सागर उपळकर, श्री महेश कोरके, श्री अक्षय घाटे, श्री छोट्या क्षीरसागर व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामुळे नगरसेवक अक्षयजी गंगेकर यांचे प्रभाग क्रं.१ मधील नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.

जाहिरात Extra

Video Advertisement

FM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन डबल क्लिक करा

ताज्या बातम्या