धक्कादायक : सोलापूरात वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलंबित

सोलापूरात वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलंबित

सोलापूर : प्रतिनिधी

विजापूर रोडवरील नागेश ऑर्केस्ट्रा बार निर्बंध असतानाही सुरू राहिला कसा आणि त्याची माहिती तुम्हाला का नव्हती, असा जाब विचारत पोलिस आयुक्त हरीश बैजल यांनी विजापूर नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उदयसिंह पाटील यांच्यावर थेट कारवाई करत त्यांना निलंबितच केले आहे. तर डीबी पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक शीतलकुमार कोल्हाळ यांच्यासह आठ जणांना मुख्यालयात आणले आहे.

सोलापूरात वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलंबित
सोलापूरात वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलंबित

विजापूर नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उदयसिंह पाटील व डीबी पथकाचे प्रमुख शीतलकुमार कोल्हाळ यांची पोलिस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षाला तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यात डीबी पथकातील राजकुमार तोळनुरे, श्रीरंग खांडेकर, पिंटू जाधव, शिवानंद भीमदे, अंबादास गड्डम, अतिश पाटील, इम्रान जमादार व राठोड या आठ पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पोलिस आयुक्त हरीश बैजल यांनी अचानक केलेल्या खळबळ उडाली आहे.तडकाफडकी बदल्यांमुळे शहर पोलिस आयुक्तालयात खळबळ उडाली आहे.

30 ऑक्टोबर रोजी रात्री विजापूर रोडवरील नागेश डान्स बारवर सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. प्रीती टिपरे यांनी कारवाई केली होती. त्यात जवळपास 39 जणांवर कारवाई करण्यात आली. डान्स बारमध्ये सुरू असलेले अश्लील नृत्य व ग्राहकांची गर्दी पाहून त्यांनी विजापूर नाका पोलिस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मदतीसाठी बोलावले होते. तरीही, डॉ. प्रीती टिपरे या स्वतः जाऊन डान्स बारवर कारवाई केली. कारवाईनंतर डॉ. प्रीती टिपरे यांनी कारवाईची माहिती पोलिस आयुक्त बैजल यांना दिली. त्यानंतर पोलिस आयुक्त बैजल यांनी ही कारवाई केल्याचे समजते

जाहिरात Extra

Video Advertisement

FM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन डबल क्लिक करा

ताज्या बातम्या