भीमशक्ती सांस्कृतिक शैक्षणिक कला व क्रीडा मंडळ,रमामाता महिला मंडळ व संतोषजी सर्वगोड मित्र परिवार यांच्यावतीने काल दीपावली पाडव्यानिमित्त दिवाळीचे किट वाटप

241 Views

पंढरपूर : प्रतिनिधी

दिवाळी हा सण संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो,तसेच मागील दोन वर्षापासून संपूर्ण देशावर कोरोनाचे संकट आले होते,आता कुठेतरी लसीकरण झाल्याने आणि कोरोनाची दुसरी लाट ओसारल्याने नागरिकांच्या मनात आनंदमय वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच सततचे लॉकडाऊन आणि संचार बंदी मुळे गोरगरीब नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अशातच एक सामाजिक बांधिलकी जपत काल संतोष सर्वगोड मित्र परिवार यांच्या वतीने एक हात मदतीचा असे म्हणून दिवाळीचे साहित्य वाटप केले आहे.,
सर्वत्र दिवाळी साजरी होत असताना अनेक समाजातील निराधार, गरीब कुटुंब मात्र या आनंदापासून दूर असतात. या वंचित घटकातील व्यक्तींनाही दिवाळीचा आनंद घेता

भीमशक्ती सांस्कृतिक शैक्षणिक कला व क्रीडा मंडळ,रमामाता महिला मंडळ व संतोषजी सर्वगोड मित्र परिवार यांच्यावतीने काल दीपावली पाडव्यानिमित्त दिवाळीचे किट वाटप
भीमशक्ती सांस्कृतिक शैक्षणिक कला व क्रीडा मंडळ,रमामाता महिला मंडळ व संतोषजी सर्वगोड मित्र परिवार यांच्यावतीने काल दीपावली पाडव्यानिमित्त दिवाळीचे किट वाटप

यावा,त्यांचेही दिवाळी गोड व्हावी यासाठी पंढरपूर शहरातील सेवाभावी संस्था आणि काही दानशूर व्यक्ती,पुढे सरसावल्या आहेत. साखर ,रवा, साबण,गोड तेल,मैदा,बजाज तेलबाटली, उठणे तसेच दिवाळीचे सर्व साहित्याचे किट.काल दीपावली पाडव्यानिमित्त भीमशक्ती सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळच्या वतीने वाटप करण्यात आले.यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून पंढरपूर नगरपालिकेचे,उपमुख्यअधिकारी :सुनिल वाळुजकर,नगरसेवक: अमोल डोके,नगरसेवक: इस्लाम भुरी,नगरसेवक:संजयजी निंबाळकर,तसेच नगरसेवक: वामन (तात्या) बंदपट्टे सह युवकनेते उमेश सर्वगोड,आर.पी.आय शहराध्यक्ष संतोष पवार,समाजसेवक बसवेश्वर देवमारे,समाजसेवक:जुबेर बागवान,
भीमशक्तीचे आधारस्तंभ : राहुल मोरे, शिवाजी चंदनशिवे,दत्ता चंदनशिवे,धर्मपाल जाधव,सिद्धार्थ सरवदे, अरुण सर्वगोड,सुखदेव माने साहेब, रवींद्र सर्वगोड,इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते, त्याचबरोबर भीमशक्ती सांस्कृतिक शैक्षणिक कला व क्रीडा मंडळ रमामाता महिला मंडळ व संतोष सर्वगोड मित्र परिवाराचे सर्व सदस्य कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहिरात Extra

Video Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

FM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन डबल क्लिक करा

ताज्या बातम्या