विठ्ठलराव शिंदे कारखान्यास राष्ट्रीय पातळीवरील प्रथम क्रमांकाचा साखर निर्यात पुरस्कार प्रदान

विठ्ठलराव शिंदे कारखान्यास राष्ट्रीय पातळीवरील प्रथम क्रमांकाचा साखर निर्यात पुरस्कार प्रदान

माढा : प्रतिनिधी

विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यास नॅशनल फेडरेशन ऑफ को.ऑप.शुगर फॅक्टरीज लि.नवी दिल्ली या संस्थेकडून सन 2020-21 हंगामात केलेल्या उच्चांकी साखर निर्यातीसाठी राष्ट्रीय पातळीवरील प्रथक क्रमांकाचा पुरस्कार नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला.

विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने सन 2020-21 मध्ये उच्चांकी साखर निर्यात केलेबद्दल नॅशनल फेडरेशन ऑफ को.ऑप.शुगर फॅक्टरीज लि.नवी दिल्ली या संस्थेकडून राष्ट्रीय पातळीवरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झालेला होता. सदर पुरस्काराचे वितरण मंगळवार दि.16/11/2021 रोजी माजी केंद्रीय कृषीमंत्री तथा खा.शरदचंद्रजी पवार, नॅशनल फेडरेशनचे अध्यक्ष मा.दिलीप वळसेपाटील, राज्याचे आरोग्यमंत्री मा.राजेश टोपे, साखरसंघ मुंबई अध्यक्ष मा.जयप्रकाश दांडेगावकर ,नॅशनल फेडरेशनचे कार्यकारी संचालक मा.प्रकाश नाईकनवरे यांचे शुभहस्ते व इतर मान्यवरांचे उपस्थितीत करण्यात आले.

विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने संस्थापक चेअरमन आ.बबनराव शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली 1 एप्रिल,2020 ते 31 मार्च,2021 या कालावधीमध्ये 77 हजार 553 मे.टन युनिट नं.1 पिंपळनेर व 4 हजार 639 मे.टन युनिट नं.2 करकंब येथील अशी एकूण 82 हजार 192 मे.टन साखरेची निर्यात केलेली आहे. निर्यात करण्यात आलेल्या साखरेमध्ये 69 हजार 745 मे.टन कच्ची साखर व 12 हजार 446 मे.टन पांढरी साखरेचा समावेश आहे. विठ्ठलराव शिंदे कारखान्यास यापूर्वी देश व राज्य पातळीवरील एकूण 20 पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. कारखान्याचे संस्थापक चेअरमन आ.बबनराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखालील विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे युनिट नं.1 पिंपळनेर व युनिट नं.2 करकंब येथील कारखान्याची यशस्वी घौडदौड चालू आहे.

विठ्ठलराव शिंदे कारखान्यास राष्ट्रीय पातळीवरील प्रथम क्रमांकाचा साखर निर्यात पुरस्कार प्रदान
विठ्ठलराव शिंदे कारखान्यास राष्ट्रीय पातळीवरील प्रथम क्रमांकाचा साखर निर्यात पुरस्कार प्रदान

सदर पुरस्कार वितरण समारंभासाठी कारखान्याचे संचालक तथा जि.प.सदस्य रणजितसिंह शिंदे, विक्रमसिंह शिंदे, रमेश येवले पाटील,प्रभाकर कुटे,शिवाजी डोके, वेताळ जाधव, लक्ष्मण खुपसे, कार्यकारी संचालक एस.एन.डिग्रजे, मार्केटींग ऑफिसर नागेश नायकुडे व आदी मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात Extra

Video Advertisement

FM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन डबल क्लिक करा

ताज्या बातम्या