सराईत गुन्हेगार सुरज ऊर्फ भैय्या गुंडप्पा सुखसे यास एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्द

सराईत गुन्हेगार सुरज ऊर्फ भैय्या गुंडप्पा सुखसे यास एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्द
183 Views

सोलापूर : प्रतिनिधी
शहरातील एमआयडीसी व जेलरोड पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार सुरज ऊर्फ भैय्या गुंडप्पा सुरवसे, वय २८ वर्षे रा. ७९ सरवदे नगर, विडी घरकुल, सोलापूर यास एगपीडीए अधिनियम १९८१ अन्वये दि. २१ / १२ / २०२१ रोजी स्थानबध्द केले आहे.

सुरज ऊर्फ भैय्या गुंडप्पा सुरवसे हा मागील अनेक वर्षीपासून आर्थिक फायदा मिळवण्यासाठी दहशत व मिती घालून नागरीकांविरुध्द गुन्हेगारी वर्तन केले आहे. तो स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी व्यापारी व सामान्य नागरीक यांना दहशत व भिती घालून जुना विडी घरकुल, गोंधळी वस्ती, राजेश पायलेट चौक, रंगराज नगर, हैद्राबाद रोड, भारत नगर, मुळेगाव रोड, समाधान नगर, विडी घरकुल परिसर मार्केट यार्ड या परिसरात गंभीर स्वरूपाचे गुन्हे करीत आहे. या परिसरात घातक शस्त्रानिशी फिरून जबरी चोरी करणे, घरफोडी करणे, दुखापत करणे, दगडफेक करणे, खुनाचा प्रयत्न करणे, खंडणी मागणे आणि प्रतिबंधक आदेशाचा भंग करणे यासारखे गंभीर गुन्हे करत असतो. अशा प्रकारची गुन्हेगारी कारवाई करून सुरज ऊर्फ भैय्या गुंडप्पा सुरवसे याने परिसरात दहशत व भिती निर्माण करून सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण केली आहे. अशा प्रकारे त्याने परिसरात दहशत निर्माण करून स्वत:स धोकादायक इसम म्हणून सिध्द केले आहे.

सराईत गुन्हेगार सुरज ऊर्फ भैय्या गुंडप्पा सुखसे यास एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्द
सराईत गुन्हेगार सुरज ऊर्फ भैय्या गुंडप्पा सुखसे यास एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्द

सुरज ऊर्फ भैय्या गुंडप्पा सुरवसे याचे विरुध्द शहरातील एमआयडीसी व जेलरोड पोलीस ठाण्यास एकूण ०५ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याच्या नोंदी आहेत. त्यास त्याच्या गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी सन २०२० मध्ये कलम १०९ फौ.प्र.सं अन्वये व सन २०२१ मध्ये कलम क.५६ (१) (अ) (ब) महा. पो. अधि. नुसार दोन वर्षाकरीता तडीपारची कारावाई करण्यात आली होती.सुरज ऊर्फ भैय्या गुंडप्पा सुरवसे याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही, पुन्हा त्याने सन २०२१ मध्ये अलीकडील काळात फिर्यादी व साक्षीदार यांचेवर ब्लेडने व दगडाने हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यासारखा गंभीर स्वरुपाचा गुन्हा केला आहे.

सुरज ऊर्फ भैय्या गुंडप्पा सुरवसे याचे विरुध्द वेळोवेळी कार्यवाही करुनही त्याच्या गुन्हेगारी वर्तनामध्ये कोणतीच सुधारणा झाली नाही. त्याच्या गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी मा. पोलीस आयुक्त यांनी त्यास एमपीडीए अधिनियम १९८१ अन्वये स्थानबध्दतेचे आदेश निर्गमित केले आहेत. त्यास आदेशाची बजावणी करुन येरवडा कारागृह, पुणे येथे दाखल करण्यासाठी रवानगी करण्यात आली आहे

जाहिरात Extra

Video Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

FM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन डबल क्लिक करा

ताज्या बातम्या