सिद्धेश्वर यात्रेत बाबत मोठा निर्णय मंदिर चालू,नंदीध्वज मिरवणूक नाही? अक्षता सोहळ्याला 50 जणच

सिद्धेश्वर यात्रेत मंदिर चालू, नंदीध्वज मिरवणूक नाही? अक्षता सोहळ्याला 50 जणच*

सोलापूर:प्रतिनिधी

सिद्धेश्वर यात्रेबाबत राज्य सरकारकडून आदेश आला असून, त्यानुसार आपत्कालीन समितीची बैठक अध्यक्ष, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीला महापालिका आयुक्त पी शिवशंकर, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, पोलीस उपायुक्त वैशाली कडुकर, तहसीलदार यांची उपस्थिती होती .

यात्रेस परवानगी देण्याबाबत सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांना बैठकीत केल्या. त्यानुसार आयुक्त रविवारी आदेश काढणार आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पत्र आल्यानंतर तत्काळ आदेश काढू असे, आयुक्त म्हणाले.

मागील वर्षी जे नियम घालून यात्रा करण्यास परवानगी दिली होती, तशी परवानगी यंदाही देण्यात येणार आली आहे. शासनाच्या आदेशानुसार पोलिस महापालिका व संबंधित यंत्रणेची बैठक घेऊन सूचना देण्यात आली आहे. यात्रेतील नियमावली बाबत आयुक्त यांना स्वतंत्र आदेश काढण्याबाबत सूचना दिल्या आहेत, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

सिद्धेश्वर यात्रेत मंदिर चालू, नंदीध्वज मिरवणूक नाही? अक्षता सोहळ्याला 50 जणच*
सिद्धेश्वर यात्रेत मंदिर चालू, नंदीध्वज मिरवणूक नाही? अक्षता सोहळ्याला 50 जणच*

राज्यामध्ये वाढते कोरोनाचे रुग्ण पाहता यंदाही नंदीध्वज मिरवणूक काढली जाणार नाही, मात्र यात्रेच्या पाच दिवसाच्या काळात सिद्धेश्वर मंदिर मात्र भाविकांसाठी खुले ठेवण्यात येणार आहे. एकदम गर्दी न करता ठराविक अंतराने भाविकांना सोडले जाणार आहे, यात्रेतील प्रमुख विधी असलेल्या अक्षता सोहळ्यासाठी यावर्षी ही केवळ 50 मानकऱ्याना परवानगी असेल असे सांगण्यात आले

जाहिरात Extra

Video Advertisement

FM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन डबल क्लिक करा

ताज्या बातम्या