स्वेरीचे विद्यार्थी कपिल रोंगे हे सुवर्ण पदकाने सन्मानित

पंढरपूर-प्रतिनिधी

स्वेरी अभियांत्रिकीत शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग या विभागामध्ये अंतिम वर्षात शिकत असलेल्या कपिल भीमराव रोंगे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून ‘श्री निवृत्ती व्होनप्पा गायकवाड सुवर्णपदक ’ या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
          पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या एप्रिल-मे २०२१ या परीक्षेमध्ये सोलापूर विद्यापीठ संलग्नित सर्व महाविद्यालयांतून सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विषयांमध्ये सर्वाधिक सीजीपीए गुण घेऊन सर्व प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केल्यामुळे श्री निवृत्ती व्होनप्पा गायकवाड यांच्या तर्फे
असलेल्या ‘श्री.निवृत्ती व्होनप्पा गायकवाड सुवर्णपदक’ हा पुरस्कार स्वेरीच्या कपिल भीमराव रोंगे यांनी पटकावला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आयोजित १७व्या दीक्षांत सोहळा समारंभात प्रमुख पाहुणे वामसी लॅबचे प्रमुख व ख्यातनाम उद्योजक एम. केशव रेड्डी यांच्या हस्ते व कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या उपस्थितीत कपिल भीमराव रोंगे यांना हे सुवर्णपदक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कपिल रोंगे हे स्वेरीचे विश्वस्त बी.डी.रोंगे यांचे चिरंजीव आहेत. गोपाळपूर (ता. पंढरपूर) मधील ओसाड माळरानावर संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे आणि त्यांच्या सहकारी अभियंत्यांनी एकत्र येऊन विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या हितासाठी म्हणून सन १९९८ साली उच्च तंत्रशिक्षणाची सोय निर्माण करून दिली. आता मात्र ग्रामीण विद्यार्थ्यांबरोबरच शहरी व देशातील विविध भागातील विद्यार्थ्यांचा कल स्वेरीकडे वाढतोय. महाविद्यालयाच्या स्थापनेपासून शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व पु.अ.हो. सोलापूर विद्यापीठाच्या शैक्षणिक निकालात स्वेरीचा विशेष दबदबा नेहमीच राहिलेला आहे. महाविद्यालयाच्या स्थापनेनंतर पहिल्याच बॅचची विद्यार्थिनी कु.रुपाली पवार हीने शिवाजी विद्यापीठात प्रथम येऊन सुवर्णपदक मिळवले होते. तेथून सुवर्णपदके स्वेरीकडे येण्यास सुरवात झाली. गेल्या वर्षी ऋतुजा पाटील यांनी अभियांत्रिकीच्या सर्व ब्रँच मधून प्रथम क्रमांक मिळवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुवर्णपदक व सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात प्रथम क्रमांक म्हणून श्री निवृत्ती व्होनप्पा गायकवाड सुवर्णपदक असे एकाचवेळी दोन सुवर्णपदक विजेत्या ठरल्या. तसेच श्रीनाथ देशमुख यांनीही सुवर्णपदक मिळविले तर यंदा पुन्हा कपिल भीमराव रोंगे यांनी सुवर्णपदक मिळवून सुवर्णपदक मिळविण्याची परंपरा कायम राखली आहे. स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे, शैक्षणिक अधिष्ठाता व विभागप्रमुख डॉ. प्रशांत पवार व वर्गशिक्षकांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. सुवर्णपदक मिळाल्यामुळे स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे, अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले तसेच संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्त, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज, स्वेरी अंतर्गत असलेल्या बी. फार्मसीचे प्र.प्राचार्य डॉ. मिथुन मणियार, डिप्लोमा इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.एन.डी. मिसाळ, डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतीश मांडवे, अधिष्ठाता, विभागप्रमुख, अभियांत्रिकी व फार्मसीचे सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थ्यांनी कपिल रोंगे यांचे अभिनंदन केले.  

जाहिरात Extra

Video Advertisement

FM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन डबल क्लिक करा

ताज्या बातम्या