युवक नेते रोहन परिचारक यांच्या उपस्थितीत कर्मयोगी च्या निसर्गरम्य प्रांगणात राज्यस्तरीय तंत्र परिषदेचे आयोजन.

कर्मयोगी च्या निसर्गरम्य प्रांगणात राज्यस्तरीय तंत्र परिषदेचे आयोजन.

पंढरपूर : प्रतिनिधी
कर्मयोगी अभियांत्रिकी मध्ये 14 मे रोजी संपन्न होणार “कर्माटेक 2 के 2022” विद्यार्थ्यांचे अभियांत्रिकीमधील ज्ञान वृधिंगत होऊन त्याला चालना व प्रोत्साहान देण्यासाठी कर्मयोगी अभियांत्रिकी महाविद्यालय शेळवे पंढरपूर येथे शनिवार 14 मे रोजी “कर्माटेक 2के22” या राज्यस्तरीय तंत्र परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे चेअरमन श्री रोहन परिचारक यांनी दिली.
याबाबत ची अधिक माहिती देताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील म्हणाले की “कर्माटेक 2के22” मध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलि कम्युनिकेशन, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनियरिंग, सिव्हिल व मेकॅनिकल इंजिनियरिंग विभागातील विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकीच्या ज्ञानावर आधारित विविध स्पर्धेचे आयोजन केले आहे. यामध्ये पेपर प्रेझेंटेशन, पोस्टर प्रेझेंटेशन, प्रोजेक्ट एक्सिबीशन, मोडेल मेकिंग अश्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून वीस हजार रुपायंहून अधिक ची बक्षिसे विद्यार्थ्यांना दिली जाणार आहेत. या सर्व स्पर्धा राज्यस्तरीय स्तरावर होतील. तसेच सदरच्या स्पर्धेमध्ये राज्यातील विविध नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयातून जवळपास पाचशेहून अधिक विद्यार्थी सहभागी होणार असून अभियांत्रिकीच्या सर्व शाखेतील विद्यार्थ्यानी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन महावि्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील व “कर्माटेक 2के22” चे संयोजक डॉ. अभय उत्पात यांनी केले.

कर्मयोगी च्या निसर्गरम्य प्रांगणात राज्यस्तरीय तंत्र परिषदेचे आयोजन.
कर्मयोगी च्या निसर्गरम्य प्रांगणात राज्यस्तरीय तंत्र परिषदेचे आयोजन.

या कार्यक्रमासाठी प्रिसिजन कॅमशाफ्ट प्रा. लि. चे प्रमुख श्री यतीन शहा व कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य श्री दादासाहेब साळुंखे हे प्रमुख अतिथि म्हणून लाभणार आहेत.

जाहिरात Extra

Video Advertisement

FM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन डबल क्लिक करा

ताज्या बातम्या