पीकअप आयशरवर आदळला : दोन ठार
1,412 Views

मोहोळ : प्रतिनिधी

रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या आयशर टेम्पोला पाठीमागून आलेल्या पिकअपने जोराची धडक दिली. या अपघातात दोघे जण जागीच ठार झाले असून अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.ही दुर्दैवी घटना आज म्हणजे शुक्रवार १३ मे च्या पहाटे ५ वाजता देवडी पाटी परिसरातील हॉटेल श्रीकृष्णजवळ घडली आहे.

या अपघातासंदर्भात मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई- कल्याणहून सोलापूरकडे घराचे सामान घेऊन निघालेला आयशर टेम्पो क्रमांक एम.एच. ४३ बी.आर.५२५२ हा शुक्रवारी १३ मे रोजी पाच वाजता देवडी गावचे शिवारात हॉटेल श्रीकृष्ण जवळ रस्त्याच्या कडेला थांबला होता.

पीकअप आयशरवर आदळला : दोन ठार
पीकअप आयशरवर आदळला : दोन ठार

त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या पिकअप क्रमांक एम.एच.२० इ एल ७२ या गाडीने आयशर टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक दिली.या अपघातात रिजवान अब्दुल गणी शेख (वय २२,रा.वैजापूर औरंगाबाद ) व रिहान फैजल कयेशअल्ली (वय ३५,राहणार झारखंड) हे दोघे जागीच ठार झाले. तर पाठीमागे बसलेले दोघेजण जखमी झाले आहेत.त्यांना पुढील उपरार्थ सोलापूरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.याप्रकरणी आयशर टेम्पोचा ड्रायव्हर चेतन बिभीषण खंदारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास अपघात पथकाचे पोलीस कर्मचारी ज्योतीबा पवार हे पुढील तपास करीत आहेत.

जाहिरात Extra

Video Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

FM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन डबल क्लिक करा

ताज्या बातम्या