दर्ग्याला जाताना मालट्रकने रिक्षात बसलेल्या अख्ख्या कुटुंबाला चिरडले;एक युवती ठार तर सहाजण गंभीर जखमी

445 Views

सोलापूर प्रतिनिधी

शहरात पुन्हा रक मोठा अपघात झाला आहे.शुक्रवार असल्याने अख्ख कुटुंब शहरातील शाहजहूर येथील दर्ग्याला दर्शनासाठी रिक्षामद्धे जात होते.पण सुसाट चाललेल्या मालट्रकने रिक्षाला शहरातील शेळगी जवळ असलेल्या मार्गावर चिरडले.यामध्ये एका युवती जाग्यावर ठार झाली आहे.मिसबा शुकुर मुलानी(वय 14 वर्ष,रा आदर्श नगर,शेळगी परिसर,सोलापूर शहर)असे मृत्य झालेल्या युवतीचे नाव आहे.तर त्याच कुटुंबातील इतर आठ सदस्य देखील गंभीर जखमी झाले आहेत.सर्व जखमींना सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.रुकसाना कोरबू(वय 45,),जन्नत कोरबु(20 वर्ष),हसीना शब्बीर कोरबु(वय 25 वर्ष),अलिम शुकूर कोरबू(वय 3 वर्ष),नौशाद सुरज कोरबू(वय 25 वर्ष),मुजिर पठाण(वय 24 वर्ष),मोहम्मद साद(वय वय 7 वर्ष) असे जखमींचे नाव आहेत.

मुस्लिम समाजातील नागरिक दर गुरुवारी व शुक्रवारी वेगवेगळ्या दर्ग्याला जाऊन दर्शन घेत असतात.असाच एक परिवार शुक्रवारी दुपारी नमाजनंतर दर्ग्याकडे दर्शनासाठी निघाले होते.पण वाटेतच मालट्रक क्रमांक एमएच 43 बीपी 8788 या ट्रकने रिक्षा (क्रमांक एमएच 13 एएफ 2209) याला चिरडले आहे.यामध्ये रिक्षाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे.रिक्षा चालक देखील गंभीर जखमी झाला असून त्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.

दर्ग्याला जाताना मालट्रकने रिक्षात बसलेल्या अख्ख्या कुटुंबाला चिरडले;एक युवती ठार तर सहाजण गंभीर जखमी
दर्ग्याला जाताना मालट्रकने रिक्षात बसलेल्या अख्ख्या कुटुंबाला चिरडले;एक युवती ठार तर सहाजण गंभीर जखमी

शेळगी येथे रिक्षाचा मोठा अपघात झाल्याची माहिती माहिती होताच,नातेवाईकांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गर्दी केली.तसेच शहरातील इतर सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.रुग्णालयात डॉक्टरांची एकच धांदल उडाली होती.पोलिसांनी ज्यादा कुमक मागवून गर्दीला हटविले आहे.सामाजिक कार्यकर्ते येऊन जडवाहतूक बाबत संताप व्यक्त करत होते.

जाहिरात Extra

Video Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

FM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन डबल क्लिक करा

ताज्या बातम्या