*सत्तेत येताच आ.समाधान आवताडेंचा विकास कामाचा धुमधडाका सुरू,केंद्रीय रस्ते विकास निधीतून मंगळवेढ्यासाठी १७ कोटी मंजूर*

*सत्तेत येताच आ.समाधान आवताडेंचा विकास कामाचा धुमधडाका सुरू,केंद्रीय रस्ते विकास निधीतून मंगळवेढ्यासाठी १७ कोटी मंजूर*

प्रतिनिधी: मंगळवेढा

तालुक्यातील रस्त्यांसाठी केंüद्रीय रस्ते विकास व पायाभूत सोयीसुविधामधून १७ कोटी रुपये मंजूर झाले आहेत अशी माहिती पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे.

हुलजंती ते नंदेश्वर या मार्गावरील रस्त्याच्या रुंदीकरण व सुधारणा करण्यासाठी ८ कोटी रुपये तर जित्ती ते मरवडे या मार्गावरील रस्त्याच्या रुंदीकरण व सुधारणा करण्यासाठी ९ कोटी रुपये इतका निधी मंजूर झाला आहे. आ. आवताडे यांच्या अथक प्रयत्नांतून यापूर्वीही राज्य शासनाच्या अर्थसंकल्पात पंढरपूर – मंगळवेढा तालुक्यातील विविध रस्ते सुधारणा आणि बांधणीसाठी भरघोस निधी प्राप्त झाला आहे. मतदारसंघाच्या धोरणात्मक प्रगतीसाठी आणि पायाभूत विकासासाठी केंद्रस्थानी असणाऱ्या रस्ते विकासासाठी आ. आवताडे हे नेहमीच प्रयत्नशील असतात. आ. आवताडे यांच्या रस्ते विकास अनुषंगाने विकासाभिमुख दूरदृष्टीतील कार्यात्मक भूमिकेमुळे सध्या वाहतुकीला येत असलेले अडथळे दूर होण्यास मोठी मदत होणार आहे. पंढरपूर व मंगळवेढा विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावाचा समतोल विकास व्हावा यासाठी आ. आवताडे यांनी केंद्रीय रस्ते व महामार्ग विकासमंत्री ना. नितीन गडकरी यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता आ. आवताडे यांच्या या मागणीवरून रस्ते विकास निधीतून सदर निधी मंजूर झाला आहे.

*सत्तेत येताच आ.समाधान आवताडेंचा विकास कामाचा धुमधडाका सुरू,केंद्रीय रस्ते विकास निधीतून मंगळवेढ्यासाठी १७ कोटी मंजूर*
*सत्तेत येताच आ.समाधान आवताडेंचा विकास कामाचा धुमधडाका सुरू,केंद्रीय रस्ते विकास निधीतून मंगळवेढ्यासाठी १७ कोटी मंजूर*

पंढरपूर व मंगळवेढा विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावाचा समतोल आणि व्यापक पद्धतीने विकास व्हावा याकडे आपले वैयक्तिक लक्ष असून यासाठी निधीची कोणतीही कमतरता पडू देणार आहे. मतदारसंघातील नागरिकांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला तो मी माझ्या कामातून सार्थ ठरविणार आहे. येत्या काळात केंद्र व राज्य शासनामार्फत उर्वरित रस्ते कामांसाठी लागणाऱ्या निधीसाठी पाठपुरावा सुरूच राहणार आहे. आ. आवताडे यांच्या माध्यमातून केंद्रीय रस्ते व महामार्ग विकासमंत्री ना. नितीन गडकरी यांच्यामुळे केंद्राकडून एवढा भरीव आणि मोठ्याप्रमाणातील निधी पहिल्यांदाच मंगळवेढा तालुक्यातील विकास कामांना मिळाल्याची भावना जनतेतून व्यक्त होत आहे.

जाहिरात Extra

Video Advertisement

FM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन डबल क्लिक करा

ताज्या बातम्या