रोहन परिचारकांच्या मार्गदर्शनाखाली कर्मयोगीचे प्लेसमेंट मध्ये पुन्हा एकदा घवघवीत यश.*

430 Views

पंढरपूर; प्रतिनिधी
श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (अभियांत्रिकी) महाविद्यालयातील कम्प्युटर सायन्स अँड इंजिनियरिंग विभागातील गणेश मोरे या विद्यार्थ्याची पुणे येथील बायज्यूस या कंपनी मध्ये निवड झाली असून त्यांना वार्षिक ७ लाख रुपयांचे पॅकेज मिळाले आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी दिली.
पुणे येथील बायज्यूस या नामांकित कंपनीने घेतलेल्या मुलाखातीमधून गणेश मोरे या विद्यार्थ्याची निवड केली आहे. दर वर्षी प्रमाणेच शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये ही कर्मयोगीने प्लेसमेंट क्षेत्रामद्धे आपले प्रभुत्व कायम ठेवले आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण होण्याधीच च विद्यार्थ्यांची नामांकित कंपनी मध्ये निवड होताना दिसून येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या आणि महाविद्यालयाच्या दृष्टीने ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागामार्फत दिले जाणारे प्रशिक्षण हे कार्पोरेट क्षेत्रात नोकरी लागण्यासाठी अतिशय पूरक व उपयोगी होत आहे असे निवड झालेल्या विद्यार्थी आवर्जून सांगतात.

*रोहन परिचारकांच्या मार्गदर्शनाखाली कर्मयोगीचे प्लेसमेंट मध्ये पुन्हा एकदा घवघवीत यश.*
*रोहन परिचारकांच्या मार्गदर्शनाखाली कर्मयोगीचे प्लेसमेंट मध्ये पुन्हा एकदा घवघवीत यश.*

श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे चेअरमन श्री. रोहन परिचारक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए बी कणसे, रजीस्ट्रार श्री. जी डी वाळके, उप प्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मोहसीन शेख, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. आशीष जोशी, विभागप्रमुख प्रा. धनंजय शिवपूजे, प्रा. अनिल बाबर, प्रा. राहुल पांचाळ, प्रा. दीपक भोसले, प्रा. अभिनंदन देशमाने व इतर सर्व प्राध्यापक यांनी गणेश मोरेचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

जाहिरात Extra

Video Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन डबल क्लिक करा

ताज्या बातम्या