कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर येथे कर्मयोगी स्मृती महोत्सव संपन्न”


पंढरपूर:प्रतिनिधी
कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर या ठिकाणी श्रद्धेय कै. सुधाकरपंत परिचारक यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त आयोजित भव्य आंतरशालेय विविध सांस्कृतिक कलागुण स्पर्धांनी कर्मयोगी स्मृती महोत्सव संपन्न झाला. या स्मृति महोत्सवांमध्ये पंढरपुरातील सर्व नामवंत शाळांमधील विद्यार्थी विविध स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते.
या स्पर्धेमध्ये २ गटांमध्ये १० उपक्रम घेण्यात आले. यामध्ये रांगोळी, चित्रकला, वक्तृत्व, निबंध, भाज्यांची सजावट, फुलांची सजावट, तसेच भगवद्गीता श्लोक पठण, सुभाषित माला पाठांतर, एकपात्री अभिनय व अत्यंत अनोखी आणि वेगळ्या पद्धतीची स्पर्धा म्हणजे शालेय सौंदर्य स्पर्धा. अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी साठी अशा प्रकारच्या अनेक स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या. या स्पर्धेमध्ये पंढरपुरातील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन भरघोस पारितोषिके प्राप्त केली. या विविध स्पर्धांचे परीक्षण करण्यासाठी पंढरपुरातील नामवंत शाळेचे शिक्षक तसेच मुख्याध्यापक आणि नामांकित चित्रपट कलाकार श्री. श्रीकांत बडवे-महाजन यांना निमंत्रित करण्यात आले होते.

या स्पर्धेचे आयोजन प्रशालेच्या सर्व कलागुणसंपन्न प्राचार्या प्रियदर्शिनी सरदेसाई यांनी केले. तसेच या कार्यक्रमाच्या पारितोषिक वितरणासाठी पंढरपुरातील प्रसिद्ध संगीत विद्यावाचस्पती श्री. प्रसाद कुलकर्णी हे प्रमुख पाहुणे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ सीमाताई परिचारक या होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेचे समन्वयक श्री. गिरीश खिस्ते यांनी केले तर आभार सारिका बनसोडे यांनी मानले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेच्या सांस्कृतिक समन्वयक व सौ. वृषाली काळे, सर्व शिक्षक व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले. संस्थेचे प्रमुख विश्वस्त मा.श्री. रोहनजी पारिचारक यांनी सहभागी विद्यार्थी विद्यार्थिंनींचे कौतुक केले.
