अमरावती बाजार समितीच्या सभापतिपदी अशोक दहीकर


अमरावती बाजार समितीच्या सभापतिपदी अशोक दहीकर
दि ५ अमरावती
अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी अशोक दहीकर यांची बिनविरोध निवड आज (४ सप्टेंबर) करण्यात आली. दोन वर्षात अस्थिर बाजार समितीला दहीकर यांच्या रूपाने तिसरे स भापती लाभले.
प्रफुल्ल राऊत यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या सभापती पदासाठी आज निवडणूक घेण्यात आली. निवडणुकीपासून आतापर्यंत दोन सभापतींनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे तिसऱ्या सभापती पदासाठी ही निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली. राजकीयदृष्ट्या अस्थिर असलेल्या बाजार समितीत आतापर्यंत एका ही सभापतीला कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. नवीन कापूस बाजाराच्या सभागृहात प्राधिकृत अधिकारी तथा विभागीय अधिकाऱ्यांच्या २८ ऑगस्टच्या आदेशानुसार घेण्यात आली. उपविभागीय अधिकारी तथा प्राधिकृत अधिकारी म्हणून इब्राहिम चौधरी यांच्या उपस्थितीत ही निवडणूक पार पडली. या वेळी उपसभापती नाना नागमोते, संचालक प्रकाश काळबांडे, किशोर चांगोले, सुनील वऱ्हाडे, प्रवीण भूगुल, प्रफुल्ल राऊत, उषा वनवे, किरण महल्ले, विकास इंगोले, रंगराव बिचुकले, श्याम देशमुख, प्रांजली भालेराव, मिलिंद तायडे, उमेश घुरडे, सतीश अट्टल, प्रमोद इंगोले, बंडू वानखडे उपस्थित होते.
