श्री पांडुरंग साखर कारखान्याकडून शेतकरी व कामगारांची दिवाळी गोड.


पंढरपुर:प्रतिनिधी
श्री पांडुरंग साखर कारखान्याने नेहमीच कामगारांचे हित जोपासले आहे. कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकऱ्याची व कामगारांची दीपावली गोड व्हावी यासाठी मागील गळीत हंगाम 2017-18 गाळप केलेल्या ऊसास दीपावली सणासाठी शेतकऱ्यांना प्रती मे. टन रु 50/- प्रमाणे ऊस बिल व सवलतीच्या दराची 30 किलो साखर तसेच कामगाराना 18% प्रमाणे दीपावली बोनस व सानुग्रह अनुदान देणार असल्याचे कारखान्याचे चेअरमन श्री सुधाकरपंत परीचारकसाहेब यांनी जाहीर करून ऊस उत्पादक शेतकरी व कामगाराना सुखद धक्का दिला आहे.तसेच ज्या ऊस उत्पादकांची ठेवी कारखान्याकडे जमा आहे त्यांना ठेवींवरील व्याजाची एकूण रक्कम रु 98 लाख दिपावली पूर्वी अदा करणार असल्याचे सांगितले
कारखान्याचे चेअरमन मा. श्री सुधाकरपंत परिचारक साहेब यांनी सांगितले की, सध्या संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून ऊस उत्पादकाकडे दीपावली सण साजरा करण्यासाठी पैशाची गरज असताना कारखान्याने प्रती मे. टन रु 50/- प्रमाणे जास्तीचे ऊस बील देण्याचे ठरवले आहे. वास्तविक पाहता गळीत हंगाम2 2017-18 मधील कारखान्याची एफ आर पी रु 2155/- निघत असताना कारखान्याने पूर्वीच्या एफ आर पी पेक्षा प्रती मे. टन रु 145/- ज्यादाची रक्कम शेतकऱ्यांना दिलेले आहे. या हंगामात रु 2300/- प्रती मे . टन प्रमाणे ऊस बील शेतकऱ्यांना पूर्वीच दिलेले असून दीपावली साठी आणखी रु50/-प्रती मे. टन जास्तीचे ऊस बील देऊन,गळीत हंगाम 2017-18 मध्ये गाळप केलेल्या उसास प्रती मे. टन 2350/-प्रमाणे ऊस बील अदा करनार आहे. त्यामुळे या हंगामात एफ आर पी पेक्षा एकूण रु195/-जास्तीची ऊस बिलाची रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे.
