600 Views

‎मुंबई  । प्रतिनिधी

वर्षभरात राज्य विधिमंडळाचे अधिवेशन 100 दिवस झाले पाहिजे, मत आता केवळ सर्वपक्षीय नेत्यांच्या भाषणापुरते राहिले आहे पण प्रत्यक्षात मात्र गेल्या 7 ते 8 वर्षात एकदाही अधिवेशनाने 100 वा दिवस पाहिलेला नाही. विरोधी पक्षात असताना कायम 100 दिवसाचे अधिवेशनातील कामकाज झाले पाहिजे, अशी  मागणी करणाऱ्या युती सरकारने तर केवळ 8 दिवसात हिवाळी अधिवेशनाचा बोरिया बिस्तरा गुंडाळायचे ठरवले आहे.

19 ते 30 नोव्हेंबरपासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे.  आजपर्यंतच्या अधिवेशनाची आकडेवारी पाहिली तर, आघाडी सरकारच्या काळात अधिवेशनाचे दिवस जरी कमी असले तरी मात्र सरासरी 300 तासांहून अधिक कामकाज झाल्याचे दिसून येते. तर युती सरकारच्या काळात एकाही वर्षी कमीत कमी 300 तास कामकाज झालेले नाही. हिवाळी अधिवेशनात दुष्काळ, कर्जमाफी, मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि विविध मंत्र्यांवर झालेले आरोप या मुद्यांवरून सरकारला धारेवर धरण्याची जोरदार तयारी विरोधकांनी केली आहे.

सत्ताधारी व विरोधी पक्षनेते यांचे अधिवेशनातील कामकाजाबद्दल प्रतिपादन

हे सरकार पळ काढण्याचा प्रयत्न करत आहे. विरोधकांकडून उपस्थित होणाऱ्या प्रश्नांची उत्तरे सरकारकडे नाहीत म्हणून अधिवेशनाचा बोरिया बिस्तरा गुंडाळण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. गेल्या तीन वर्षात विरोधकांचा बहिष्कार असताना त्यांनी कामे उरकून घेतल्यामुळे काही तास वाढलेले दिसतात.
धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते

आम्ही अधिवेशनाचा कालावधी वाढवा, यासाठी आग्रह धरला होता. पण भाजपाच्या नेत्यांना शेजारील राज्यात प्रचारासाठी जायचे असल्याने त्यांनी अधिवेशनाचा कालावधी कमी केला आहे.
– राधाकृष्ण विखे, विरोधीपक्षनेते

आमची कायम चर्चेची तयारी आहे. कामकाज शिल्लक राहिले तर अधिवेशनाचा कालावधी वाढवू. मात्र विरोधकांना फक्त गोंधळ घालायचा असतो. गदारोळ करण्यात त्यांना रस आहे. विरोधकांच्या काळात कधीही १०० दिवस अधिवेशन झालेले नाही.
– गिरीष बापट,
संसदीय कार्यमंत्री

जाहिरात Extra

Video Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

FM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन डबल क्लिक करा

ताज्या बातम्या