832 Views

आज सर्व सोलापूर जिल्ह्यातील लोकांचं लक्ष लागले आहे ते म्हणजे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीकडे . आगामी लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असल्यामुुुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापू लागलं आहे. सोलापूर जिल्ह्य़ात प्रमुख राजकीय पक्षांमधील हालचाली वाढल्या आहेत. लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या मंडळींनी जनसंपर्क वाढविण्याच्या दृष्टीने दौरे सुरू केले आहेत.वेळोवेळी सभा-मेळावेही घेतले जात आहेत.सभेत एकमेकांवरील टीकास्त्र, श्रेयवाद यामुळे लोकांच्या चावडीवरच्या  चर्चेला उधाण आले आहे . मात्र जवळपास सर्व राजकीय पक्षांमध्ये अंतर्गत गटबाजी, एकमेकांचे हिशेब चुकते करण्याच्या डावपेचातून साठमारीचे राजकारण सुरू झाले आहे. त्यामुळे या सर्व प्रमुख राजकीय पक्षांमध्ये अस्वस्थतेचे सुप्त वातावरण दिसून येत आहे . त्याची झळ काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे व भाजपचे खासदार शरद बनसोडे या दोघा संभाव्य प्रतिस्पध्र्यानाही बसत आहे.

तैयारी जीत की !
                         तैयारी जीत की !

मागील २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत सोलापुरात काँग्रेसचे तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना पराभवाचा धक्का बसला  होता. भाजपचे नवखे अ‍ॅड. शरद बनसोडे हे मोदी लाटेत एक लाख ४० हजार मताधिक्याने निवडून आले होते.  त्याचा वचपा काढण्यासाठी ७८ वर्षांचे शिंदे हे पुन्हा लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत. संपूर्ण सोलापूर मतदारसंघात ठिकठिकाणी त्यांचे दौरे वाढले आहेत. मात्र लोकसभेसाठी हालचाली होत असतानाच अलीकडे भारिप-बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सोलापुरात येऊन इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर जाहीर सभा घेतली. या सभेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता काँग्रेसच्या पोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्याच वेळी याच सोलापूर लोकसभा मतदारसंघाशी निगडित पंढरपूर-मंगळवेढय़ाचे काँग्रेसचे आमदार भारत भालके हे स्वत:ला काँग्रेसमध्ये राहणे असुरक्षित असल्याचे जाहीरपणे सांगत आहेत. आपण सध्या तरी काँग्रेसमध्ये आहोत, उद्याचे सांगता येत नाही, अशी भूमिका घेत आमदार भालके यांनी वेगळ्या पक्षाची वाट धरण्याचा मनोदय अप्रत्यक्षपणे बोलून दाखविला आहे. या सर्व परिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर, एकीकडे प्रकाश आंबेडकर यांनी स्वत:ची ताकद वाढविण्यासाठी हाती घेतलेला प्रयोग आणि त्यातून धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होण्याची आणि त्यातच आमदार भारत भालके हे काँग्रेसचा हात सोडण्याची शक्यता विचारात घेता अखेर त्याचा लाभ आपल्यालाच होईल, याचे गणित मांडत भाजपच्या पोटात समाधान दिसून येते आहे असे असूनही विधानपरिषदेचे आ. प्रशांत परिचारक हे देखील पक्षांतर करतील अशी चिन्हे दिसू लागली आहेत.

शिवसेनेतही तोच खेळ :
शिवसेनेतही सोलापुरात असलेली पक्ष्यामधील  गटबाजीदेखील चावडीवरील चर्चेचा विषय बनला आहे. स्थानिक पातळीवर शिवसैनिकांमध्ये जुने व नवे चेहरे असा वाद पेटला आहे. मूळचे माढा तालुक्यातील असलेले व सध्या यवतमाळमधून विधान परिषदेवर निवडून आलेले आमदार तानाजी सावंत हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अगदी मर्जीतील समजले जातात. म्हणूनच त्यांच्यावर सोलापूर जिल्ह्य़ाच्या संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शिक्षण व साखरसम्राट असलेले आमदार तानाजी सावंत हे शिवसेनेत तसे नवखे आहेत. त्यांचे बंधू प्रा. शिवाजी सावंत यांचा सेनेशी अनेक वर्षांपासूनचा संबंध आहे; परंतु त्यांनीही काही वर्षांपूर्वी शिवसेना सोडून राष्ट्रवादीचे घडय़ाळ हातात बांधले होते. नंतर अलीकडे ते पुन्हा स्वगृही परतले. आता तानाजी व शिवाजी यांच्या ताब्यात जिल्ह्य़ातील शिवसेनेची सूत्रे गेली आहेत. या मिळालेल्या संधीचा लाभ घेत सावंतबंधूंनी स्वत:चा प्रभाव वाढविण्यासाठी पक्षातील जुन्या हितशत्रूंचा बंदोबस्त केला आहे. त्यामुळे पुरत्या गटबाजीने पोखरलेल्या शिवसेनेतही असुरक्षिततेचे वातावरण दिसून येते.
सोलापूरच्या भागात राष्ट्रवादीचा प्रभाव हा अद्यापि टिकून असला तरी त्यांच्यात गटबाजीचा आणि साठमारीचा विषय न संपणारा आहे. माढय़ाचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांची आगामी माढा लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी निश्चित असल्याचे मानले जात आहे .असे असतानाही  त्यांना पक्षांतर्गत दगाफटका बसण्याची शक्यता आतापासूनच राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. माढय़ाचे आमदार बबनराव शिंदे व राष्ट्रवादीच्या छुप्या मदतीने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बनलेले त्यांचे संजय शिंदे हे मोहिते-पाटील यांचे विरोधक मानले जातात. माढा लोकसभेसाठी निवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख हेदेखील राष्ट्रवादीकडून इच्छुक आहेत. यात शेवटच्या क्षणी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे कोणाची झोळी भरतील यावर सर्वांचं लक्ष लागलं आहे.
डावपेच :
सत्ताधारी भाजपला अंतर्गत गटबाजीने सर्वाधिक पोखरले आहे. पालकमंत्री विजय देशमुख व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यातील अंतर्गत गटबाजीने तर हद्दच पार करून टाकली आहे. त्याचा फटका बसण्याच्या भीतीमुळे भाजपच्या पोटात असवस्थेच्या कळा येत आहेत. खासदार शरद बनसोडे हे पालकमंत्री देशमुख यांच्या गटात मोडले जातात, तर त्यांना शह देण्यासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी बनसोडे यांचा पत्ता कापून सोलापूरच्या राखीव लोकसभा मतदारसंघातून राज्यसभा सदस्य अमर साबळे यांच्या नावाची वर्णी लावत आहेत.

जाहिरात Extra

Video Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

FM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन डबल क्लिक करा

ताज्या बातम्या