धनगर समाजाच्या एस.टी.आरक्षणासाठी वयक्तिक लक्ष घाला ,धनगर समाज शिष्टमंडळ .

एस.टी.आरक्षणासाठी वयक्तिक लक्ष घाला.धनगर समाजाच्या शिष्टमंडळा
562 Views

पंढरपूर । प्रतिनिधी

आज पंढरपूर मध्ये शिवसेना प्रमुख सभे साठी आले असता.धनगर समाजाच्या शिष्टमंडळाने उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मागील ६० वर्षांपासून धनगर समाज एस .टी आरक्षणाच्या अमंलबजावणी करण्याची मागणी करीत असून , प्रत्येक वेळी धनगर समाजाला गाजर दाखवले आहे. साहेब किमान तुम्ही तरी आता वयक्तिक लक्ष घालून एस.टी आरक्षाची अमंलबजावणी करण्याचे निर्देश द्यावेत. अशी मागणी आज पंढरपूर येथे सकल धनगर समाजाच्या वतीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कडे करण्यात आली.

एस.टी.आरक्षणासाठी वयक्तिक लक्ष घाला.धनगर समाजाच्या शिष्टमंडळा
धनगर समाजाच्या एस.टी.आरक्षणासाठी वयक्तिक लक्ष घाला.धनगर समाजाच्या शिष्टमडळ

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस ने मागील६०वर्षे धनगर समाजाला एस .टी आरक्षणाचे गाजर दाखवून समाजाची मते घेवुन राज्यात व केंद्रात सत्ता उपभोगली.तर २०१४ मध्ये तेव्हा चे भाजपाचे प्रदेश अध्यक्ष व आताचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेनेचे मंत्री सुभाष देसाई यांनी बारामती येथील आंदोलनात उपोषणकर्त्याना लेखी पत्र द्वारे धनगर समाजाने भाजपा शिवसेनेला पाठिंबा दिला तर पहिल्या कँबिनेट मध्ये आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू असे लेखी देवून सुद्धा ४.५ वर्षे झाली. परंतु तो प्रश्न सुटला नाही.धनगर समाजाने आपल्या सरकार वर विस्वास ठेवून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस ला सत्तेवरून पाय उतार केले.तेव्हा उद्धव साहेब आपण वयक्तिक लक्ष देवून हा आरक्षणाच्या अमंलबजावणी चा प्रश्न मार्गी लावावा.असे निवेदन धनगर समाजाच्या वतीने सुरेश भाऊ कांबळे , माऊली हळणवर ,सुभाष मस्के ,पंकज देवकते ,धनाजी पुजारी ,अतुल गावडे ,आण्णा सलगर यांनी दिले.

जाहिरात Extra

Video Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

FM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन डबल क्लिक करा

ताज्या बातम्या