पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा खून


सांगोला । प्रतिनिधी
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन,तसेच पती-पत्नीच्या सतत होत असलेल्या भांडणावरून पतीने पत्नीचा साडीने गळा आवळून खुन केल्याची घटना सांगोला तालुक्यातील आलेगाव येथे झाली. सीमा सुनील पाटोळे वय 30 राहणार ,आलेगाव असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
सुनील पाटोळे वय 35 असे संशयीत आरोपीचे नाव आहे. सीमा पाटोळे व सुनील पाटोळे काम करून खाण्यासाठी पुण्या मध्ये राहत होते.चार-पाच दिवसांपूर्वी ते दोघे आपल्या मूळ गावी आलेगाव येथे आले होते.मात्र दोघा मध्ये सतत वेगवेगळ्या कारणावरून भांडण व वाद विवाद होत ,सतत चारित्र्याच्या संशयावरून सुनीलने सीमाचा साडीने गळा आवळून खून केला. तसेच खून करून सुनीलने सीमाचा भाऊ मल्हारी कांबळे यास, सीमाला ठार मारल्याचे फोन करून सांगितले.


मल्हारी कांबळे यांनी पोलीसात खबर दिली .पोलिसांनी आलेगाव येथे तपास सुरू केला. मात्र दोन दिवसांनी सीमाचा मृतदेह हा आलेगाव येथील एका ज्वारीच्या शेतात मिळाला. खून केल्यानंतर सुनील पसार झाला आहे तसेच सीमाला पाटोळे यांना दोन अपत्य आहेत. सुनील पाटोळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सांगोला पोलीस निरीक्षक नाळे करत आहेत.