संडे स्पेशल- संपादकीय- घोड्यांना कुरघोडीच वेढ!


संडे स्पेशल संपादकीय घोड्यांना कुरघोडीच वेढ!
आजचे युग हे स्पर्धेच युग आहे आणि अशा स्पर्धेच्या युगात जिंकण्यासाठी काही लोक स्पर्धेतल्या घोड्यासारखं वागू लागले आहेत.एक एक असे घोडे तैयार झाले आहेत की सतत आणि नेहमी इतरांवर कुरघोडी करण्याचं स्वप्न पाहात असतात.काही जणांना तर जिंकण्याची एवढी तीव्र इच्छा असते की त्यापुढे त्यांना इतर कोणत्याही गोष्टीचं भान राहत नाही. यश मिळवण्यासाठी ते गैरमार्गाचा सुद्धा वापर करतात.नेहमी शर्यतीतल्या घोड्यासारखं पळत सुटायचं आणि इतरांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करायचा .बरं असोत ,पण हे सर्व करत असताना त्यांच्या मनात एक प्रकारची स्वार्थी भावना, इतरांविषयी ईर्ष्या या प्रकारच्या गोष्टी जन्म घेत असतात आणि तो व्यक्ती सुद्धा स्वतःच्या उत्कट प्रचितीसाठी त्या प्रमाणे वागू लागतो.या सर्व गोष्टी तून नकळत एकमेकांविषयी क्रूर भावना निर्माण होते आणि अशातूनच एकमेकांना होणारी मदतीची भावना मरते आणि मग माणसं सोबत असूनही एकमेकांविषयी आतून कठोर असतात.तोंड जरी बोलत नसलं तरी चेहरा सर्व गोष्टी बोलून दाखवत असतो.आणि कुठे ना कुठे तरी या सर्व गोष्टींचा माणुसकीवर परिणाम होत असतो जे समाजासाठी घातक आहे.नाही नाही स्पर्धेमुळे माणुसकी वर परिणाम होतो असे मला म्हणायचे नाही पण कुठे ना कुठे तरी स्पर्धेचा एक धागा माणुसकी शी जोडला गेला आहे.आजचे युग स्पर्धेचे युग आहे असे नेहमी म्हटले जाते. पण मला ते तितकेसे पटत नाही. स्पर्धा हा काही केवळ आजच्या युगाचाच युगधर्म नाही.