स्वतःचे मानसिक आरोग्य जपणे ही काळाची गरज- डॉ. तेजस भोपटकर.


आरोग्यमय धनसंपदा डॉ. तेजस भोपटकर
MBBS, DPM, DNB(Psychiatry)
मानसोपचार-तद्न्य
स्टेशन रोड, पंढरपुर
8605605997
मेंदू हा माणसाचा सर्वात महत्वाचा अवयव. आणि मन हे मेंदूचे महत्वाचे कार्य! जसे शरीराला आजार होतात तसेच मनालाही आजार होऊ शकतात. यांनाच मनोविकार किंवा मानसिक आजार म्हणतात.
पण मनाचे कार्य अत्यंत गुंतागुंतीचे असल्याने मनोविकाराबाबत समाजात अनेक गैरसमज पसरलेले दिसतात. आधुनिक विज्ञानाने आज 297 प्रकारचे मनोविकार शोधले आहेत.
औदासिन्य, चिंतारोग, व्यसने, लैंगिक समस्या,निद्रानाश, लहान मुलांमधील अतिचंचलता, मोबाईलचे व्यसन इ. आजार आज घराघरात दिसून येतात. पण “मनोविकार म्हणजे वेड लागणे” या गैरसमजामुळे लोक उपचार घेण्याचे टाळतात आणि हे आजार तीव्र बनतात.


“मनोविकार म्हणजे काल्पनिक त्रास, अशा व्यक्तिने स्वतःच बरे व्हायला हवे, औषधे काय कामाची? ” हा मोठा गैरसमज आहे.
मनोविकार हे मेंदूचे खरेखुरे आजार आहेत. मेंदूतील ‘रासायनिक बिघाडामळे’ ते होतात. यात व्यक्तीचे स्वतःच्या भावना, विचार व कृतीवरील नियंत्रण बिघडते. अशावेळेस मानसोपचार-तद्न्याचा सल्ला आवश्यक असतो. सौम्य आजारासाठी समुपदेशन तर तीव्र आजारासाठी औषधे घ्यावीच लागतात.
मनोविकार टाळण्यासाठी प्रत्येकाने शारिरीक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे.
नियमित व्यायाम, वेळेचे नियोजन करणे, एखादा खेळ रोज खेळणे, छंद जोपासणे, सामाजिक कार्यात गुंतणे, पुरेशी विश्रांति व झोप घेणे या सवयी आपल्याला मनाचे आरोग्य टिकवायला मदत करतात.
मग आजपासून आपण स्वतःचे आणि आपल्या जवळच्या व्यक्तींचे मानसिक आरोग्य जपण्यासाठी, सुधारण्यासाठी आणि प्रसंगी संकोच न करता मानसोपचार-तज्ञाचा सल्ला घेण्यासाठी कटिबध्द होणार ना ?