निम्म्या जागा तसेच मुख्यमंत्री आमचा असेल तरच युती करू – वंचित बहुजन आघाडी

सोलापूर व्हायरल ।  प्रतिनिधी।                                    आगामी विधानसभा निवडणुकीच्या तारखा केव्हाही आणि कोणत्याही क्षणी घोषित होणार असून, आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे ते म्हणजे काही गोष्टींकडे.

पहिली गोष्ट म्हणजे भाजपात सुरु असलेल्या व वेटिंग वर असलेल्या आजी माजी व विद्यमान आमदारांकडे. फक्त भाजप च नव्हे तर सेनेतही आमदारांची मेगाभारती सुरूच आहे. तरीसुद्धा सेना-भाजपात जागा वाटपाबद्दल रस्सीखेच सुरूच आहे.भाजप सरकार ‘अब की बार २२० पार’ चा नारा लावत आहेत आणि पुन्हा एकदा सरकार स्थापनेवर जोर देत आहेत.

निम्म्या जागा तसेच मुख्यमंत्री आमचा असेल तरच युती करू - वंचित बहुजन आघाडी
निम्म्या जागा तसेच मुख्यमंत्री आमचा असेल तरच युती करू – वंचित बहुजन आघाडी !

दूसरी गोष्ट म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादीला लागलेली मेगागळती.आता ही मेगा गळती कशामुळे लागली तर ती सहकार क्षेत्रात मदत व ईडी पासून बचावासाठी हे आता काही सांगण्याची गरज राहिलेली नाही. अशातच महाराष्ट्र राज्याचे शिखर समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्यात अजित पवार, मोहिते पाटील, बँकेचे अध्यक्ष तसेच संचालक मंडळाच्या विरोधात कडक कारवाई चालू असल्याने भाजप भरतीला महापूर आला आहे.

आणि आता तिसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात निर्णायक फॅक्टर म्हणजे ‘वंचित फॅक्टर’
वंचित बहुजन आघाडी काँग्रेस पक्षासोबत युती करण्यासाठी तयार आहे, परंतु आमची एकच मागणी आहे की, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री वंचितचा असावा,व विधानसभेच्या निम्म्या जागा वंचितला सोडाव्यात नाहीतर २८८जागा लढवण्याची आमची तयारी आहे, अशी मागणी आता वंचित कडून होत आहे. सोलापूर मधील २२उमेदवारांच्या मुलाखती झालेल्या असून १४४ उमेदवारांना अर्ज देण्यात आले आहेत. त्यासाठी राज्यातील आजी- माजी आमदार-खाजदर, नगरसेवक,काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना पक्षातील उमेदवार आणि विशेष म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यकर्त्यांने वंचितची उमेदवारी मिळावी म्हणून मुलाखत दिली आहे.अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे पार्लमेंटरी आण्णा राव पाटील यांनी सांगितली

जाहिरात Extra

Video Advertisement

FM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन डबल क्लिक करा

ताज्या बातम्या