MIDC चा मुद्या गाजविणार का ? विधानसभा उमेदवारांचे भवितव्य.

पंढरपूर । प्रतिनिधी                                                     येणाऱ्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभेसाठी दामाजी कारखान्याचे चेअरमन समाधान दादा आवताडे यांनी रणशिंग फुंकले असून जवळपास सर्व दौरे, गाठी भेटी सुरू झाले आहेत. त्यातच पंढरपूर मंगळवेढा शहरातील सगळ्यात मोठी समस्या त्यांच्या लक्षात आली ती म्हणजे अनेक युवक रोजगार पासून वंचित आहेत. तसेच मागील तीन महिन्यापूर्वी समाधान आवताडे यांनी भव्य नोकरी महोत्सव घेऊन आठराशे युवकांना रोजगार दिला होता, तसेच आता आसवनी प्रकल्प दामाजी कारखाना उभारून त्यामध्ये लवकरच अनेक तरुणांना रोजगार मिळेल अशी तयारी त्यांनी केली आहे. तसेच MIDC च्या मुद्यावरून युवकांन मध्ये जरा नाराजीच दिसत आहे.

आजपर्यंतच्या लोकप्रतिनिधीनी या मुद्यावर लक्ष केंद्रित न केल्यामुळे युवक सुद्धा यावेळी मतदान प्रश्नावर जरा जास्तच आक्रमक झाले आहेत असे दिसून येत आहेत. त्यामुळे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील युवकांचा लोकप्रतिनिधीवर नाराजी दिसून येत असून येणाऱ्या विधानसभेमध्ये ते आवताडे बंधूंना निदान रोजगार निर्मितीचा एक नवीन चेहरा म्हणून हाती घेतील, अशी चर्चा सध्या सर्व स्तरावर चालू आहे. मागील विधानसभा निवडणुकीमध्ये भालके यांना 91863 मते मिळाली होती, तर स्वाभिमानी शेतकरीचे सदस्य उमेदवार म्हणून प्रशांत परिचारक यांना 82950 मते मिळाली होती. याच निवडणुकीत समाधान दादा आवताडे यांना 43900 मते मिळाली होती. त्यानंतर समाधान आवताडे यांनी दामाजी कारखाना व मंगळवेढा पंचायत समिती कृषी बाजार समिती जिंकून आमदार भारत भालके यांना चारी मुंड्या चीत केले आहे. त्यातच आता आमदार भारत भालके यांचे वारु यंदा तरी समाधान दादा आवताडे रोखणार का?अशी चर्चा सध्या नागरिकातून चालू आहे.

जाहिरात Extra

Video Advertisement

FM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन डबल क्लिक करा

ताज्या बातम्या