पंढरीत कोरोनाची साखळी तुटेना, नागरिक झाले भयभीत
पंढरपूर :- प्रतिनिधी
सोहन जैस्वाल ( संपादक )मो.7517071803
पंढरपूर शहर हे काही दिवसांपूर्वी कोरोना मुक्त शहर म्हणून ओळखले जात होते. मात्र तीर्थक्षेत्र पंढरपुरात आता नव्याने कोरोना रुग्ण वाढत चाले आहे. आत्तापर्यंत 33 कोरोना रुग्णांची नोंद पंढरपूर शहर व तालुक्यात झाली आहे ग्रामीण भागात देखील कोरोना विषाणूने आपला रंग दाखण्यात सुरुवात केली आहे .तसेच काल पंढरपूर शहरात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे, तालुका पोलीस स्टेशन च्या पाठीमागे राहणाऱ्या 80 वर्षेच्या वृद्धाचा कोरोना संसर्ग मुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे पंढरपूर शहरात कोरोनाचा पहिला बळी गेल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. कोरोनाची साखळी तुटणार का ? आणि पंढरपूर शहर हे पुन्हा कोरोनामुक्त होणार का ? अशी चर्चा नागरिकांतून चालू आहे. यासाठी प्रत्येक नागरिकांनी शासनाचे नियम पाळावे तरच कोरोनाची साखळी तुटणार आहे.
तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 33 वर पोहचली आहे त्यामुळे प्रशासनाकडून कडक उपाय योजना सुरू करण्यात आले आहेत . स्वाइब तपासणी करण्याच्या हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. शहर व तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या 33 झाली असून त्यातील 7 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे,25 रुग्णापैकी 21 रुग्णांवर वाखरी येथे उपचार सुरू आहे, कोरोना बाधितांची साखळी हळूहळू वाढू लागल्याने पंढरपूरकरासह तालुक्यातील नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. कोरोना विषाणूंची साखळी तोडायची असेल तर प्रत्येक नागरिकांनी शासनाने दिलेले नियम पाळणे गरजेचे आहे.