*जलजीवन योजनेचे काम पाहणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करा…!मरवडे येथील ग्रामस्थाची आ.समाधान आवताडेंन कडे साकडे*

प्रतिनिधी;प्रतिनिधी

मंगळवेढा तालुक्यातील अनेक गावांमध्ये ‘हर घर नल से जल’ अंतर्गत जलजीवन मिशनची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत मात्र या कामांमध्ये अंदाधुंद कारभार सुरू असून ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंता राजकुमार पांडव हे लोकांचे म्हणणे ऐकून घेत नाहीत योजना कुठे सुरू आहे, अंदाजपत्रक कितीचे आहे, याची माहिती ग्रामस्थांना देत नाहीत कामावर कुठेही माहिती फलक लावलेला नाही, निकृष्ट दर्जाच्या पाईप वापरण्यात येत असून त्याकडेही अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे असा आरोप मरवडे येथे “आमदार गाव भेट” दौऱ्यामध्ये ग्रामस्थांनी पाणीपुरवठा विभागावर केला त्यावेळी आमदार अवताडे यांनी संबंधित अधिकाऱ्याला योजनेची माहिती विचारली असता त्यांना कोणत्या कंपनीच्या पाईप वापरणार आहात हेही सांगता आले नाही त्यामुळे त्या अधिकाऱ्यावर कारवाई करून सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली.
रविवारी दिवसभर फटेवाडी, तळसंगी, मरवडे, कात्राळ, कर्जाळ, कागष्ट, डिकसळ, माळेवाडी, पौट, येळगी, हुलजंती या गावचा गाव भेट दौरा आमदार आवताडे यांनी अधिकाऱ्यांचा ताफ्यासह केला. यावेळी गावोगावच्या ग्रामस्थांनी पाणीपुरवठा, महावितरण पात्र लाभार्थ्यांना रेशनचे धान्य न मिळणे अशा अनेक तक्रारी आमदार आवताडे यांच्या समोर ग्रामस्थांनी मांडल्या यावेळी त्या त्या अधिकाऱ्यांना उत्तरे द्यायला लावली महिला बालकल्याण व एकात्मिक प्रकल्प विकास अधिकारी जे बी गारोळे यांनी माहिती देताना सांगितले की ज्या कुटुंबांमधील 18 वर्षाखालील मुलाची आई किंवा वडील मयत झाले आहेत किंवा ते त्या मुलाला सांभाळत नाहीत अशा मुलांचे पालन करणाऱ्या पालनकर्त्याच्या नावावर शासन प्रति महिना अडीच हजार रुपये बालसंगोपनासाठी देत आहे तरी त्या योजनेचा फायदा अशा गरजू मुलांना गाव पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी मिळवून द्यावा किंवा थेट माझ्या कार्यालयाकडे जरी कागदपत्रे सादर केली तरी त्यांना अनुदान सुरू करून देण्यात येईल अशी माहिती गारोळे यांनी दिली नागरिकांच्या विविध प्रश्नांचे समाधान करत आ समाधान आवताडे यांनी हा दौरा पार पाडला.
यावेळी या दौऱ्यामध्ये विविध खात्याचे अधिकारी त्या त्या गावचे सरपंच उपसरपंच सोसायटी सदस्य चेअरमन पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

*जलजीवन योजनेचे काम पाहणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करा...!मरवडे येथील ग्रामस्थाची आ.समाधान आवताडेंन कडे साकडे*
जलजीवन योजनेचे काम पाहणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करा…!मरवडे येथील ग्रामस्थाची आ.समाधान आवताडेंन कडे साकडे

लोकांच्या तक्रारीला तोंड द्यावे लागत असल्याने कार्यालयप्रमुख दौऱ्यातून गायब?

रविवारी झालेल्या गाव भेट दौऱ्यामध्ये अगोदरच्या दोन दिवसात नागरिकांनी विविध खात्याच्या कारभाराविरोधात दाखवलेला रोष पाहता तालुका कृषी अधिकारी गणेश श्रीखंडे,सामाजिक वनीकरण परिक्षेत्र मंगळवेढाचे वनक्षेत्रपाल नीलिमा खोब्रागडे नसल्याने त्यांच्या ठिकाणी अतिरिक पदभार असलेल्या आशा ससाणे,साहाय्यक निबंधक प्रमोद दुर्गुडे गटविकास अधिकारी शिवाजीराव पाटील यांनी दौऱ्याला दांडी त्यांच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना दौऱ्यात पाठवले होते ही बाब लक्षात आल्यानंतर ठोस कारण न देता दौऱ्याला गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याच्या सूचना त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या असल्याचे आ आवताडे यांनी पुण्यनगरीशी बोलताना सांगितले.

पौट येथे दारू विक्रीचा महापूर
दौऱ्यामध्ये पौट गावात महिलांनी गावात बेसुमार दारू विक्री सुरू असून प्रपंच उध्वस्त झाले आहेत या दारू विक्रेत्यांची वारंवार पोलिसांकडे तक्रार करून ही पोलीस दखल घेत नाहीत तुम्ही तर दखल घेऊन संसार वाचवा अशी मागणी महिला भगिनींनी केल्यानंतर दारू का बंद होत नाही याचा जाब पोलिसांना विचारत दोन दिवसात या गावातील दारू बंद झाली नाही तर मला माझ्या पद्धतीने कारवाई करावी लागेल असा इसारा आमदार आवताडे यांनी पोलिसांना दिला.

जाहिरात Extra

Video Advertisement

FM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन डबल क्लिक करा

ताज्या बातम्या