कु.सुश्रुत विनय उत्पात’ यांचे सुंदर हस्तक्षर स्पर्धेत उत्तुंग यश .श्री.रोहन परिचारक यांनी त्याच्या पुढील वाटचालीस भरपूर शुभेच्छा दिल्या.

कु.सुश्रुत विनय उत्पात’ यांचे सुंदर हस्तक्षर स्पर्धेत उत्तुंग यश .श्री.रोहन परिचारक यांनी त्याच्या पुढील वाटचालीस भरपूर शुभेच्छा दिल्या.

पंढरपूर :- प्रतिनिधी

“सुंदर हस्ताक्षर हा मानवाचा ख

कु.सुश्रुत विनय उत्पात’ यांचे सुंदर हस्तक्षर स्पर्धेत उत्तुंग यश .श्री.रोहन परिचारक यांनी त्याच्या पुढील वाटचालीस भरपूर शुभेच्छा दिल्या.
कु.सुश्रुत विनय उत्पात’ यांचे सुंदर हस्तक्षर स्पर्धेत उत्तुंग यश .श्री.रोहन परिचारक यांनी त्याच्या पुढील वाटचालीस भरपूर शुभेच्छा दिल्या.

रा दागिना आहे व मनाचा आरसा आहे” या प्रख्यात ओळीप्रमाणे कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर येथील इयत्ता ८वी तील विद्यार्थी ‘कु.सुश्रुत विनय उत्पात’ याने दि.०७.०१.२०२१ रोजी “सुर्यदत्ता इन्स्टिट्युट ऑफ क्रिएटिव्ह आर्ट” व “अक्षर रसिक सुलेखन वर्ग” बावधन, पुणे यांचे संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या “English Handwriting Competition” मध्ये प्रथम क्रमांक मिळवून प्रशालेचे नाव रोशन केले.
तसेच रविवार, दि.०७.०२.२०२१ रोजी “National Handwriting Day” या दिवशी त्याला या “सुंदर हस्ताक्षर” या स्पर्धेतील यशाबद्दल बक्षिस प्रदान करण्यात येणार आहे. या बक्षिस समारंभाचा कार्यक्रम बावधन पुणे येथील संस्थेच्या कॅम्पसमध्ये होणार असुन या कार्यक्रमास “माननीय राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारी” हे उपस्थित राहणार असुन स्पर्धेचे संस्थापक मा.श्री.संजय चोरडीया यांच्या हस्ते बक्षिस समारंभ होणार आहे.
“कर्मयोगी विद्यानिकेतन” ही शाळा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जे विविध उपक्रम सतत आपल्या शाळेत राबविते हे या विद्यार्थ्याच्या यशाचे एक सुंदर उदाहरण आहे. मा.श्री.प्रशांतजी परिचारक यांचे अभ्यासु नेतृत्व व संस्थेच्या प्राचार्या मा.सौ.शैला कर्णेकर यांच्या मार्गदर्शनामुळेच सुश्रुतला हा बहुमान मिळून त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे व त्याच्या या यशात प्रशालेतील शिक्षकांचाही बहुमोल असा वाटा आहे.
या मिळविलेल्या उत्तुंग अशा यशाबद्दल संस्थेचे विश्वस्त मा.श्री.रोहन परिचारक यांनी त्याच्या पुढील वाटचालीस भरपूर शुभेच्छा दिल्या.

जाहिरात Extra

Video Advertisement

FM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन डबल क्लिक करा

ताज्या बातम्या