*मोहिते पाटील समर्थकांचा बंडांचा निर्धार मोहिते पाटलांच्या भूमिकेकडे नेत्यां सह समर्थकांचे लक्ष!*

पंढरीत;प्रतिनिधी

एकेकाळी सोलापूर जिल्ह्याची राजकीय राजधानी म्हणून अकलूजला संबोधले जात होते मोहिते पाटील बोले आणि सोलापूर जिल्हा हाले अशी राजकीय परिस्थिती या जिल्ह्याने तीन दशके अनुभवले आहे.एकेकाळी सोलापूर जिल्ह्यात मोहिते पाटलांनी बोट दाखवलेला कुठलाही सर्वसामान्य कार्यकर्ता जिल्ह्याचाच काय राज्याच्या राजकारणात मोठ मोठ्या पदावर गेले ते दिसून आले आहे.सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक सोलापूर जिल्हा परिषद सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील आमदारकीचे तिकिटे अकलूज मधून फायनल केली जात होती असेही म्हटले जाते करमाळ्याचे स्वर्गीय माजी आमदार नामदेवराव जगताप आणि अकलूजचे स्वर्गीय माजी आमदार शंकरराव मोहिते पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष सोलापूर जिल्ह्याने दोन दशके अनुभवला आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोहिते पाटील हे नाव कायम वजनदार म्हणून ओळखले गेले 2007 ला मतदार संघाचे पुनर्रचना झाली आणि माळशिरस मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला.आणि राज्याचे उपमुख्यमंत्री राहिलेले विजयसिंह मोहिते पाटील यांनी माढ्यातून विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली परंतु याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस मधील धाकटी पाती म्हणून ओळखले जाणारे अजितदादा पवार यांच्यात आणि मोहिते पाटील यांच्यात आदिनाथ कारखान्यापासून सुरू झालेला सुप्त संघर्ष आणखीन बळावला होता त्यामुळे माढ्यातून विजयसिंह मोहिते पाटील यांना निवडणूक लढवण्यास आमदार बबनदादा शिंदे व त्यांचे बंधू संजय मामा शिंदे यांच्या समर्थकांनी जोरदार विरोध केला यातूनच हा क्रीडा सोडवण्यासाठी स्वर्गीय माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांनी पंढरपूरच्या

उमेदवारीचा त्याग करीत विजयसिंह मोहिते पाटील यांना पंढरपुरातून विधानसभा निवडणूक लढवण्यास सहमती दर्शवली आणि शरद पवार यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांना पंढरपुरातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवारी दिली या निवडणुकीत विजयसिंह मोहिते पाटील यांच्या प्रचारादरम्यान अफवांचे अनेक पेंव फुटले होते पंढरपूरच्या घाटांची नावे बदलली जातील चौकांची नावे मोहिते पाटील कुटुंबीय आपल्या घरातील व्यक्तींच्या नावे ठेवतील अशीही अफवा उठवली गेली आणि यातून अशातच मोहिते पाटील यांना एकदा येथून आमदार केले तर पुन्हा ते पंढरपूर सोडणार नाहीत अशीही भावना काही परिचारक समर्थक खाजगीत व्यक्त करताना दिसून आले होते त्यामुळे विजयसिंह मोहिते पाटील यांचा जवळपास 35 हजार मतांनी पराभव झाला आणि वरवर परिचारक आणि मोहिते पाटील गटात सारे काही आलबेल आहे असे चित्र दिसून येत असतानाही या दोन्ही गटात अंतर्गत सुप्त संघर्ष सुरू झाल्याचेच राजकीय निरीक्षक व्यक्त करताना दिसून आले होते पुढे 2014 मध्ये परिचारकांनी भाजपशी दोस्ताना केला 2015 मध्ये माजी आमदार प्रशांत परिचारक हे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपचे सहयोगी आमदार म्हणून विधान परिषदेत गेले तर 2017 मध्ये पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेवर दोन दशक वर्चस्व राहिलेल्या मोहिते पाटील गटात धक्का देण्यात महाआघाडी यशस्वी ठरले होते माजी आमदार प्रशांत परिचारक आमदार संजय मामा शिंदे मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक उत्तम जानकर आमदार समाधान आवताडे यांनी एकत्र येत जिल्हा परिषदेतून राष्ट्रवादी काँग्रेसचे पर्यायाने मोहिते पाटील गटाची ही मोठी अडचण केली मात्र पुढे 2019 मध्ये स्वतः मोहिते पाटीलच भाजपमध्ये दाखल झाल्याने भाजपाच्या छत्रछायेखाली मोहिते पाटील पुन्हा जिल्ह्याच्या राजकारणाची सूत्रे आपल्या हाती घेतील असा अंदाज व्यक्त केला जात होता मात्र त्यांना माळशिरस तालुक्यातील गुंतवून ठेवण्यात राज्यातील आणि जिल्ह्यातील भाजपच्या नेत्यांना यश आले व ते असेच म्हणावे लागेल आता माढा लोकसभेसाठी धैर्यशील मोहिते पाटील हे जोरदार लंगोट लावून मैदानात उतरण्याच्या तयारीत होते पक्षाकडे त्यांनी उमेदवारीचा हट्टही धरला परंतु भाजपने जाहीर केलेल्या पहिल्याच यादी मोहिते पाटलांचा क्लीन बोल्ड झाला या पाठीमागचे बोलवते धनी राज्यातील काही बडी नेते त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातही भाजपचे काही नेते असल्याचे चर्चा होत असून यातूनच माढा मतदारसंघाचे क्लस्टर हेड असलेले प्रशांत परिचारक क यांचाही खासदार निंबाळकर यांच्या उमेदवारी मोठा पाठिंबा होता अशीच धारणा मोहिते पाटील समर्थकांचे झाल्याचे सोशल मीडिया वरून दिसून येत आहे त्यामुळे आता पुन्हा भाजप मोहिते पाटील विरुद्ध भाजप व महायुतीतील आमदार बबनदादा शिंदे संजय मामा शिंदे आणि क्लस्टर हेड प्रशांत परिचारक यांच्यातील राजकीय सुप्त संघर्ष पुन्हा उफाळून येणार असाही अंदाज व्यक्त केला जावा लागला आहे

जाहिरात Extra

Video Advertisement

FM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन डबल क्लिक करा

ताज्या बातम्या