कर्मयोगी इंस्टिट्यूट मध्ये पालक सभा संपन्न.* विद्यार्थ्यांचा सर्वांगीण प्रगतीसाठी कर्मयोगी कटिबद्ध : डॉ. एस पी पाटील

कर्मयोगी इंस्टिट्यूट मध्ये पालक सभा संपन्न.* विद्यार्थ्यांचा सर्वांगीण प्रगतीसाठी कर्मयोगी कटिबद्ध : डॉ. एस पी पाटील

पंढरपूर;प्रतिनिधी

कर्मयोगी इंस्टिट्यूट मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कर्मयोगी महाविद्यालय कटिबद्ध असून त्यांना अभियांत्रिकीच्या शिक्षणाबरोबरच एक यशस्वी अभियंता निर्माण होण्यासाठी लागणारी सर्व कौशल्ये विकसित केली जातात. तसेच पालकांनी कर्मयोगीवर ठेवलेला विश्वास आम्ही निश्चितच सार्थ ठरवू असे प्रतिपादन कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉंजी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी केले. दि ४ मे २०२४ रोजी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या पालक मेळाव्यात ते बोलत होते. या पालक मेळाव्यासाठी सुमारे ५० हून अधिक पालक उपस्थित होते.
पालक प्रतींनिधी सुधीर जाधव व भाग्यश्री कुंटला यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावेळी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाचे प्रमुख प्रा. एस एम लंबे यांनी विभागाच्या प्रगतीचा आहवाल सादर केला तसेच भविष्यामधील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी राबविण्यात येणार असलेल्या विविध उपक्रमाची माहिती सादर केली. यावेळी विभागाचा ‘बेस्ट टीचर अवॉर्ड’ प्रा. एस एम लंबे यांना प्राचार्य डॉ. एस पी पाटील हस्ते देण्यात आला. त्यांनंतर प्र. ए ए जोशी यांनी शैक्षणिक अहवाल सादर करताना विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रगतीचा चढता आलेख सादर केला. यावेळी विद्यार्थ्यांकडून उत्कृष्ट अभिप्राय मिळाल्याबद्दल त्यांना गौरविण्यात आले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर यांनी महाविद्यालयाची विस्तृत माहिती देऊन महाविद्यालयाच्या पालकांकडून असणार्‍या अपेक्षा यावर मार्गदर्शन केले. यावेळी अनेक पालकांनी मनोगते व्यक्त करून महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाबादद्ल समाधान व्यक्त केले.

कर्मयोगी इंस्टिट्यूट मध्ये पालक सभा संपन्न.*विद्यार्थ्यांचा सर्वांगीण प्रगतीसाठी कर्मयोगी कटिबद्ध : डॉ. एस पी पाटील
कर्मयोगी इंस्टिट्यूट मध्ये पालक सभा संपन्न.*
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण प्रगतीसाठी कर्मयोगी कटिबद्ध : डॉ. एस पी पाटील

श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे चेअरमन श्री. रोहन परिचारक यांनी मेळाव्याला शुभेच्छा दिल्या. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए बी कणसे, रजीस्ट्रार श्री. जी डी वाळके, उप प्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, विभागप्रमुख प्रा. राहुल पंचाळ, प्रा. अनिल बाबर, प्रा. सोमनाथ लंबे, प्रा. दीपक भोसले, प्रा. अभिनंदन देशमाने तसेच सर्व प्राध्यापक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुशील कुलकर्णी यांनी केले तर प्रा. प्रियांका कुलकर्णी यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

जाहिरात Extra

Video Advertisement

FM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन डबल क्लिक करा

ताज्या बातम्या