कर्मयोगी इन्स्टिट्यूट मध्ये शिवजयंती निमित्त विविध उपक्रम संपन्न.कम्प्युटर सायन्स इंजिनियरिंग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा स्तुत्य उपक्रम.
पंढरपूर; प्रतिनिधी
श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (अभियांत्रिकी) महाविद्यालया मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती निम्मित्त महाविद्यालयाच्या कम्प्युटर सायन्स इंजिनियरिंग व राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद लाभला अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी दिली.
महाविद्यालयाच्या कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिरिंग च्या परम अॅक्सेस तर्फे निबंध, वक्तृत्व व चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील व संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. यावेळी प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य व त्यांच्या विचारांची आजच्या काळाला गरज याविषयी विद्यार्थ्यांना संबोधित करून सहभागी विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेसाठी शंभर हून अधिक विद्यार्थ्यानी सहभाग नोंदविला. स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकांच्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले. सदरच्या स्पर्धेसाठी प्रा. सुशील कुलकर्णी, प्रा. उदय कार्वेकर, प्रा. तबस्सुम तांबोळी, प्रा. गोविंदराज पंपटवार व प्रा. गणेश बागल यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
सदरची स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रा. रणजीत भोसले, प्रा. दीप्ती कुलकर्णी, प्रा. गणेश बागल तसेच इतर सर्व प्राध्यापकांनी विशेष परिश्रम घेतले. श्रद्धा गुरव व प्रतीक्षा शिंदे या विद्यार्थिनींनी सूत्रसंचालन केले.
यावेळी श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे चेअरमन श्री. रोहन परिचारक यांनी सदारच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. यावेळी कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए बी कणसे, रजीस्ट्रार श्री. जी डी वाळके, उप प्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, विभागप्रमुख प्रा. दीपक भोसले, प्रा. अनिल बाबर, प्रा. राहुल पांचाळ, प्रा. एस एम लंबे, प्रा. अभिनंदन देशमाने व इतर सर्व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.