मारापुर येथे लोकनियुक्त सरपंच विनायक यादव यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

मंगळवेढा प्रतिनिधी;सचिन हेंबाडे 

मंगळवेढा तालुक्यातील मारापूर ग्रामपंचायतीचे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित केलेले लोकनियुक्त सरपंच विनायक यादव यांच्या वाढदिवसानिमित्त मारापुर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन शुक्रवार दि. 1 मार्च 2024 रोजी करण्यात आले आहे.

मारापुर येथे लोकनियुक्त सरपंच विनायक यादव यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन*
मारापुर येथे लोकनियुक्त सरपंच विनायक यादव यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन*

सकाळी 8:00वाजता शालेय साहित्य व खाऊ वाटप कार्यक्रम शुभहस्ते तंटामुक्त अध्यक्ष भगवान आण्णा आसबे यांच्या शुभहस्ते होणार आहे ,सकाळी 9:00 वाजता सरपंच चषक 2024 (भव्य हाफ पीच क्रिकेट सामने) उद्घाटक कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती सोमनाथ विष्णुपंत आवताडे यांच्या शुभहस्ते होणार आहे,सकाळी 10:00 वाजता सर्वरोग निदान महाआरोग्य शिबिर उद्घाटक आवताडे शुगर चेअरमन संजय महादेव आवताडे यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे,सकाळी 10:30 वाजता मोफत अन्नदान मूकबधिर शाळा, मंगळवेढा व मुक्ताई मतिमंद मुलांचे बालगृह,लवंगी येथे करण्यात येणार आहे ,सायंकाळी 7:00 वाजता भव्य नागरी सत्कार समारंभ शरदचंद्र कृषी विद्यालय मारापूरच्या भव्य प्रांगणामध्ये आयोजित करण्यात आले आहे.

मारापुर येथे लोकनियुक्त सरपंच विनायक यादव यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन*
मारापुर येथे लोकनियुक्त सरपंच विनायक यादव यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन*

तरी सर्व ग्रामस्थांनी व परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या विविध कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजक सरपंच विनायक यादव मित्रपरिवार मारापुर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

जाहिरात Extra

Video Advertisement

FM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन डबल क्लिक करा

ताज्या बातम्या